Pakistan Player Announces Retirement  Saam tv
Sports

२४ वर्षीय क्रिकेटपटूने अचानक घेतली निवृत्ती; राजकीय नेत्यांवर केले भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, क्रीडा वर्तुळात खळबळ

Pakistan Player Announces Retirement : पाकिस्तानच्या २४ वर्षीय क्रिकेटपटूने अचानक निवृत्ती घेतली. त्याने यावेळी राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.

Vishal Gangurde

शाहबेज भट्टीने क्रिकेटमधून केली निवृत्तीची घोषणा

PCB मधील राजकारणामुळे घेतली निवृत्ती

शाहबेजने सियालकोटसाठी महत्वाची कामगिरी केली होती

पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा उलथापालथ झाली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या निर्णयाने आणखी एका खेळाडूने राग व्यक्त केला आहे. बोर्डाने घेतलेल्या निर्णयामुळे २४ वर्षीय खेळाडूने अचानक निवृत्तीची घोषणा केली. बोर्डात सुरू असलेल्या राजकारणाला कंटाळून खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.

पाकिस्तानचा युवा क्रिकेटपटू शाहबेज भट्टीने राजकारणाला कंटाळून निवृत्तीची घोषणा केली आहे. शाहजेब भट्टीने ९ मार्च रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली. शाहजेबने म्हटलं की, 'अलविदा पाकिस्तान क्रिकेट. वयाच्या २४ व्या वर्षी पाकिस्तान क्रिकेट सोडत आहे. मागील वर्षांत कायदे आजम ट्रॉफी जिंकली होती. यानंतर ४० सामन्यापासून मी बँचवर बसलो आहे'.

त्याने पुढे म्हटलं की, 'माझं एक पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करण्याचं स्वप्न होतं. परंतु राजकारण, भ्रष्टाचार, कमी सुविधा यामुळे माझं करिअर उद्धवस्त झालं. मला आता माहीत झालं आहे की, आता प्रत्येक जण पाकिस्तान क्रिकेटमधून बाहेर पडत आहे'.

२०२५ साली सियालकोटने कायजे आजम ट्रॉफी जिंकली होती. शाहजेबने नवव्या विकेटसाठी २१ धावांची भागादारी केली होती. या सामन्यात शाहजेबने नाबाद ३२ धावा केल्या. शाहजेबचा संघ एका विकेटने जिंकला होता.२४ वर्षीय शाहबेजने पाकिस्तानमध्ये २ फर्स्ट क्लास सामने खेळले. त्याने त्यावेळी ३८ च्या सरासरीने ७६ धावा कुटल्या. १ लिस्ट ए आणि १ टी२० सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात शाहबेजने फलंदाजी केली नाही. गोलंदाजी करताना त्याने फर्स्ट क्लास सामन्यात ५ गडी बाद केले. त्याने लिस्ट ए मध्ये २ गडी बाद केले होते. टी२० सामन्यात त्याने १ गडी बाद केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT