Babar Azam Saam TV
Sports

Babar Azam : बाबर आझमची प्रायव्हेट चॅटिंग आणि व्हिडीओ व्हायरल! टीममधील खेळाडूच्या गर्लफ्रेंडसोबत सुरु होते...

बाबरला अडकवण्यासाठी या सर्व गोष्टी जाणूनबुजून रचल्या गेल्याचे बाबरच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.

साम टिव्ही ब्युरो

Babar Azam : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.मैदानातील खराब कामगिरीमुळे बाबरचं कर्णधारपद धोक्यात होते. आता मैदानाबाहेरही बाबर आझमच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.

बाबर आझमचे प्रायव्हेट चॅट आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्यावर त्याच्या सहकारी खेळाडूच्या प्रेयसीसोबत अफेअर असल्याचा आरोप केला जात आहे. जर तिने त्याच्याशी चर्चा सुरू ठेवली तर तिच्या प्रियकराचे संघातील स्थान कायम राहील, अशी धमकी देतानाही बाबत कथित व्हायरल चॅटमध्ये दिसत आहे.

बाबरच्या संभाषणाच्या अनेक रेकॉर्डिंगही व्हायरल होत आहेत. मात्र बाबरला अडकवण्यासाठी या सर्व गोष्टी जाणूनबुजून रचल्या गेल्याचे बाबरच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. त्याला कर्णधारपदावरून हटवण्यासाठी हे सर्व केले जात आहे.

#WeStandWithBabar आणि #StayStrongerBabarAzam असे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. अनेकांनी बाबरचे व्हायरल व्हिडीओ मॉर्फ केलेले आहेत, असं म्हटलंय. त्यामुळे एकीकडे बाबरवर आरोप होत असले तरी त्याचे चाहते त्याच्या बाजूने असल्याचं दिसत आहे.

बाबर यापूर्वीही वादात सापडलाय

बाबर अशा वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी नोव्हेंबर 2020 मध्ये एका महिलेने बाबरवर लैंगिक शोषणाचा आरोप केले होते. लग्न करण्याचे आश्वासन देऊन 10 वर्षे शोषण केल्याचा आरोप महिलेने केला होता आम्ही लग्न करायचे ठरवले होते आणि आमच्या घरच्यांना कळवले पण त्यांनी नकार दिला. मग बाबर आणि मी कोर्ट मॅरेज करायचे ठरवले. त्यादरम्यान मी त्याला माझ्याशी लग्न करा असे सांगत होती पण मी लग्न करण्याच्या स्थितीत नाही असं त्याने सांगितल्याचा आरोप महिलेने केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपमध्ये फूलऑन ड्रामा; PCBची धमकी, ICCचा नकार, पाकिस्तान संघाचं काय होणार?

Maharashtra Government: सरकारच्या तिजोरीवर लोकप्रिय योजनांचा ताण; महाराष्ट्राच्या डोक्यावर ९ लाख कोटींचं कर्ज

Maharashtra Live News Update: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अंधेरी स्टेशनदरम्यान तांत्रिक बिघाड

Famous Actress Death : हरहुन्नरी अभिनेता काळाच्या पडद्याआड; झोपेतच झाला मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

Garlic Chutney Recipe : झणझणीत लसणाची चटणी, जेवणाची वाढवेल चव

SCROLL FOR NEXT