pakistan cricket team google
Sports

AUS vs PAK: पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने स्वत:चीच लाज काढली,१४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला हा लज्जास्पद रेकॉर्ड

Australia vs Pakistan 3rd Test: पाकिस्तानचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Ankush Dhavre

Australia vs Pakistan 3rd Test, Record:

पाकिस्तानचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरु आहे. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी पूर्णपणे चुकीचा ठरवला आहे. अवघ्या ४७ धावसंख्येवर पाकिस्तानचे ४ फलंदाज माघारी परतले आहेत. दरम्यान या निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तान संघाच्या नावे लज्जास्पद विक्रमाची नोंद झाली आहे.

पाकिस्तानचा संघ ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने पिछाडीवर आहे. तिसऱ्या सामन्यातही पाकिस्तानला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. संघाची धावसंख्या ४७ असताना पाकिस्तानचे ४ फलंदाज तंबूत परतले होते.

मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर सलामीवीर अब्दुला शफीक शून्यावर बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर सॅम अयुब दुसऱ्याच षटकात शून्यावर बाद होऊन माघारी परतला. यासह दोन्ही फलंदाज शून्यावर बाद होऊन माघारी परतले. कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे की, कॅलेंडर ईयरच्या पहिल्याच कसोटीत कुठल्याही संघाचे सलामीवीर फलंदाज शून्यावर बाद झाले आहेत.

पाकिस्तानच्या प्लेइंग ११ मध्ये बदल..

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी पाकिस्तान संघात बदल करण्यात आले आहेत. या सामन्यातून शाहीन आफ्रिदी आणि इमाम उल हकला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर देशांर्गत क्रिकेटमध्ये दमदार खेळ करणाऱ्या सॅम अयुबला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच साजिद खानला देखील या सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आलं आहे. (Latest sports updates)

ऑस्ट्रेलियाचा संघ आघाडीवर..

ऑस्ट्रेलियाचा संघ या कसोटी मालिकेत २-० ने आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यात ३६० धावांनी तर दुसऱ्या कसोटीत ७९ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात पाकिस्तान संघातील फलंदाज आणि गोलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळेच पाकिस्तानला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशीही पाकिस्तानचा संघ बॅकफुटवर असल्याचं दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime : चांगला नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे पडले महागात; कोट्यवधी रुपयांचा गंडा

Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूर ४०व्या वर्षी पुन्हा होणार आई; लवकरच देणार चाहत्यांना खूशखबर...!

Post Office Scheme: फक्त व्याजावर 12 लाख कमाई! पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना तुम्ही पाहिली का?

Maharashtra Crop Inspection : शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय, प्रत्येक गावात होणार पीक पाहणी, चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश

Beed : जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर जय्यत तयारी | VIDEO

SCROLL FOR NEXT