Pakistan Semifial Qualification Scenario saam tv
Sports

पाकिस्तान अजूनही सेमीफायनल गाठू शकते, पण...! बांगलादेशला करावं लागणार अशक्यचं शक्य; क्वालिफायसाठी कसं आहे समीकरण?

Pakistan Semifial Qualification Scenario: आता पाकिस्तानच्या टीमसाठी आता सेमीफायनलचे दरवाजे बंद झालेत आहे, असा सर्वांचा समज आहे. मात्र अजूनही एक समीकरण असं आहे, ज्यामुळे पाकिस्तानची टीम सेमीफायनल गाठू शकते.

Surabhi Jayashree Jagdish

भारतीय क्रिकेट प्रेमींची इच्छा पूर्ण झाली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. ६ विकेट्सने मात देत पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानवर आपलं वर्चस्व दाखवलं आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी पाकिस्तानला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. अशातच आता पाकिस्तानच्या टीमसाठी आता सेमीफायनलचे दरवाजे बंद झालेत आहे, असा सर्वांचा समज आहे. मात्र अजूनही एक समीकरण असं आहे, ज्यामुळे पाकिस्तानची टीम सेमीफायनल गाठू शकते.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये पाकिस्तानला सलग दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागलाय. दरम्यान आता प्रश्न असा आहे की, पाकिस्तान अजूनही सेमीफायनल कशी गाठू शकते. जर पाकिस्तानला सेमीफायनल गाठायची असेल अजूनही काही संधी शिल्लक आहे. यासाठी अंतिम ४ टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी पाकिस्तानला इतर टीमवर अवलंबून रहावं लागणार आहे.

पाकिस्तान सेमीफायनल गाठण्यासाठी समीकरण

जर पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर त्यांना ग्रुप स्टेजमध्ये बांगलादेशला हरवावं लागणार आहे. यानंतर आता नेट रन-रेट लक्षात घेता पाकिस्तानला बांगलादेशवर मोठा विजय मिळवावा लागेल. त्याचप्रमाणे भारत आणि बांग्लादेश यांना दोन्ही टीम्सना न्यूझीलंडला हरवावं लागणार आहे.

जर न्यूझीलंडची टीम पुढच्या सामन्यांमध्ये भारत आणि बांगलादेशकडून पराभूत झाली आणि पाकिस्तानने बांगलादेशला हरवलं तर तिन्ही टीम्सचे गुण समान होतील. अशा परिस्थितीत सेमीफायनलचा निकाल नेट रन-रेटच्या आधारे ठरवण्यात येईल. सध्या, पाकिस्तानचा नेट रन-रेट -१.०८७ आहे, त्यामुळे त्यांना बांगलादेशवर मोठा विजय मिळवावा लागेल.

ग्रुप ए चे किती सामने बाकी?

चॅम्पियन्स ट्रॉफी२०२५ च्या गट ए मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. या गटात ३ सामने खेळले गेलेत आणि अजून ३ सामने खेळायचे बाकी आहेत. २४ फेब्रुवारी रोजी बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. त्यानंतर, बांगलादेश २७ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानशी सामना खेळणार आहे. या गटातील शेवटचा सामना २ मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT