आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा थरार पाकिस्तानात रंगणार आहे. या स्पर्धेचील ८ संघांपैकी ७ संघांनी आपल्या संघाची घोषणा केली होती. आता यजमान पाकिस्ताननेही आपला संघ जाहीर केला आहे. या संघात बाबर आझमसह मोहम्मद रिझवानलाही स्थान देण्यात आलं आहे. यासह फखर जमान, सलमान अली आगा आणि उस्मान खानलाही संघात स्थान दिलं गेलं आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डने शुक्रवारी (३१ जानेवारी) आपल्या संघाची घोषणा केली आहे. पाकिस्तानने २०१७ मध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील फायनलमध्ये भारतीय संघाला पराभूत करुन जेतेपदाला गवसणी घातली होती. आता पुन्हा एकदा पाकिस्तानने जेतेपद मिळवण्यासाठी मजबूत संघ तयार केला आहे.
पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मोहम्मद रिझवानकडे सोपवण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी बाबर आझमसह फखर जमानला देखील संधी दिली गेली आहे. फखर जमानचा रेकॉर्ड पाहिला, तर त्याने ८२ वनडे सामन्यांमध्ये ३४९२ धावा केल्या आहेत.
यासह त्याच्या नावे दुहेरी शतकी खेळी करण्याची देखील नोंद आहे. माध्यमातील वृत्तानुसार, बाबर आझम पाकिस्तानकडून डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो.
या स्पर्धेसाठी गोलंदाज म्हणून शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांना संधी दिली गेली आहे. शाहीन आफ्रिदीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ५९ वनडे सामन्यांमध्ये ११९ गडी बाद केले आहेत. यासह मोहम्मद हसनैन आणि हारीस रउफ यांना देखील संघात स्थान देण्यात आलं आहे.
मोहम्मद रिझवान (कर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सऊद शकील, तैयब ताहीर, फहीम अशरफ,अबरार अहमद, हारिस रऊफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी, खुशदील शाह, सलमान अली आगा, उस्मान खान.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.