england twitter
Sports

PAK vs ENG: याला म्हणतात कॉन्फीडन्स! PAK ला टक्कर देण्यासाठी 2 दिवसाआधीच इंग्लंडची प्लेइंग-११ जाहीर

England Playing XI: पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने २ दिवसाआधी प्लेइंग ११ ची घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

Eng vs Pak 3rd Test,England Playing XI: इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने दमदार कमबॅक केलं.

सध्या ही मालिका १-१ च्या बरोबरीत आहे. या मालिकेतील तिसरा सामना २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने २ दिवसाआधीच प्लेइंग ११ ची घोषणा केली आहे.

पराभवानंतर इंग्लंड संघात बदल

या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला होता. अंतिस सामन्यासाठी प्लेइंग ११ मध्ये बदल करण्यात आला आहे. गेल्या सामन्यात शोएब बशीर आणि जॅक लीच या फिरकी गोलंदाजांना संधी दिली गेली होती.

तर वेगवान गोलंदाज म्हणून मॅथ्यू पॉट्स आणि ब्रायडन कार्स यांना स्थान देण्यात आलं होतं. मात्र आता या दोघांनाही प्लेइंग ११ मधून बाहेर करण्यात आलं आहे. या दोघांच्या जागी गस एटकिंसन आणि रेहान अहमदला स्थान देण्यात आलं आहे. यासह बेन स्टोक्स देखील गोलंदाजीत योगदान देताना दिसून येऊ शकतो.

इंग्लंडचा संघ जेव्हा भारत दौऱ्यावर आला होता, त्यावेळी रेहान अहमदला इंग्लंड संघात स्थान दिलं गेलं होतं. त्यानंतर त्याला संघात स्थान मिळालं नव्हतं. त्यामुळे बऱ्याच महिन्यांनी त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. या खेळपट्टीवर इंग्लंडने फिरकी गोलंदाजांना खेळवण्यावर अधिक भर दिला आहे.

मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी अशी आहे इंग्लंड संघाची प्लेइंग ११:

जॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रुट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), गस एटकिंसन, रेहान अहमद, जॅक लीच, शोएब बशीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST Ticket Price: पूरग्रस्त महाराष्ट्राला दिलासा! १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द, सरकारचा मोठा निर्णय

Pune Andekar Gang : आंदेकर टोळीचे पाय आणखी खोलात; व्यावसायिकाकडून उकळली ५.४ कोटींची खंडणी

CNG Project : साखर कारखान्यातून CNG निर्मिती; कोपरगावमधील साखर कारखाना ठरला देशातील पहिला

Cheque Bounce: चेक बाउन्स झाल्यास कुठे तक्रार करू शकतो; सुनावणीसाठी किती दिवस लागतात?

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ४ ऑक्टोबरला मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक

SCROLL FOR NEXT