cricket stadium x
Sports

Operation Sindoor सुरु असताना क्रिकेट स्टेडियम उडवण्याची धमकी, पाकिस्तान स्लीपर सेलकडून धमकीचा मेल

India Pakistan Tension : पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. अशातच दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम बॉम्बने उडवून टाकू अशी धमकी मिळाल्याचे समोर आले आहे.

Yash Shirke

Ind Pak Tension : पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि मिसाईल हल्ले केल्याने भारत-पाकिस्तान संंबंध ताणले गेले आहेत. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने बीसीसीआयने आयपीएल २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या आठवड्यात आयपीएलबद्दल चर्चा होऊन अंतिम निर्णयाची घोषणा पुढच्या आठवड्यात होईल असे म्हटले जात आहे. याच दरम्यान दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली क्रिकेट स्टेडियमला बॉम्बने उडवून टाकू असा मेल दिल्ली क्रिकेट असोसिएशनला आज (९ मे) सकाळी ९ वाजता मिळाला होता. त्यानंतर डीडीसीए म्हणजेच दिल्ली क्रिकेट असोसिएशनने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. हा मेल पाकिस्तानच्या स्लीपर सेलकडून आल्याचे ईमेलमध्ये नमूद होते.

'संपूर्ण भारतात पाकिस्तानचे निष्ठावंत स्लीपर सेल आहेत. आम्ही त्यांना ऑपरेशन सिंदूरसाठी सक्रिय करु. आम्ही स्टेडियम उडवून देऊ' असा मजकूर धमकीच्या मेलमध्ये होता. हा मेल मिळताच असोसिएशनने लगेच दिल्ली पोलिसांना संपर्क केला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम देशातील महत्त्वाच्या स्टेडियम्सपैकी एक आहे. युद्धजन्य परिस्थितीमध्ये धमकीचा मेल आल्याने मोठी खळबळ उडाली.

अरुण जेटली स्टेडियमआधी गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियम बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देण्यात आली होती. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर ही धमकी देण्यात आली होती. कोलकाता आणि चेन्नई या सामन्यादरम्यान कोलकातामधील ईडन गार्डन्स क्रिकेट स्टेडियम स्फोटाने उडवून टाकू अशी धमकी मिळाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात पावसाचा कहर, ओढ्याला पूर आल्यामुळे पिंगळी लिमला रस्त्यावरची वाहतूक बंद

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT