India Pakistan Tension : ही काय पद्धत आहे भीक मागायची? पैशांसाठी पाकिस्तानने हात पसरवले, भारतानं केलं ट्रोल

Pakistan Trolled : पाकिस्तानने युद्धजन्य परिस्थितीत अन्य राष्ट्रांकडून आर्थिक मदत मागितली. त्यानंतर भारताने गोलमाल चित्रपटातील एक मीम शेअऱ करत पाकिस्तानला ट्रोल केले. पाकिस्तानने ती पोस्ट डिलीट केली आहे.
Pakistan Troll
Pakistan TrollX
Published On

भारत-पाकिस्तान तणाव वाढत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भ्याडपणे भारतावर हल्ला केला. काल (८ मे) पाकिस्तानने मिसाईल्स आणि ड्रोन हल्ले करत शस्त्रसंधींचे उल्लंघन केले. याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. भारत-पाकिस्तान युद्धाला अधिकृतपणे सुरुवात होण्याआधी पाकिस्तानने इतर राष्ट्रांकडे भीक मागायला सुरुवात केली आहे. पाकिस्तान सरकारच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करण्यात आला होता. ज्यात त्यांनी अन्य देशांकडे निधी मागण्याची विनंती केली होती.

"शत्रूच्या हल्ल्याने मोठे नुकसान सहल केल्यानंतर आम्ही आंतरराष्ट्रीय मित्रपक्षांना कर्ज देण्याची विनंती करत आहोत. युद्धजन्य परिस्थिती आणि शेअर बाजारतील तीव्र घसरणीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व मित्रराष्ट्रांना आमच्यावरील आर्थिक तणाव कमी करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन करतो", अशी पोस्ट पाकिस्तानच्या सरकारी सोशल मीडिया अकाउंट एक्सवर शेअर करण्यात आली होती.

Pakistan Troll
IPL 2025 फक्त आठवड्यासाठी स्थगित, BCCI कडून लवकरच मोठी घोषणा होणार

थोड्याच वेळात पाकिस्तान सरकारने पलटी मारली आणि 'आमचे एक्स अकाउंट हॅक झाले होते. ती पोस्ट आम्ही केली नव्हती' असे म्हटले. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, आम्ही कोणतेही ट्विट केले नाही आणि त्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करण्यात आले आहे, असे पाकिस्तानच्या आर्थिक व्यवहार मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे.

Pakistan Troll
मोठी बातमी! मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता, हायअलर्ट जारी; मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द

पाकिस्तानच्या एक्स पोस्टवर भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) पाकिस्तानची खिल्ली उडवली. त्यांनी गोलमाल या प्रसिद्ध विनोदी चित्रपटातील एक मीम शेअर केले. या मीममध्ये 'ये कोई तरीका है भीख मांगने का?' (ही काय पद्धत आहे भीक मागायची?) असे लिहिलेले होते. पाकिस्तानने लागलीच एक्स पोस्ट डिलीट केली. याच दरम्यान पाकिस्तानने शस्त्रसंधींचे उल्लंघन करत भारतावर हल्ला केला होता.

Pakistan Troll
घाबरून, गोंधळून जाऊ नका! देशात पुरेसा पेट्रोल-डीझेल साठा; पंपांवरील गर्दीनंतर इंडियन ऑइलचं स्पष्टीकरण

पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थान या ठिकाणी ५० पेक्षा जास्त ड्रोन्सने हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. पण भारतीय वायु रक्षा प्रणाली एस-४०० आणि आकाश क्षेपणास्त्राने हे हल्ला परतवून लावले. पाकिस्तानने भ्याड हल्ले केल्याने भारत-पाकिस्तान संबंध आणखीच ताणले गेले आहेत.

Pakistan Troll
पाकिस्तानात ऑपरेशन सिंदूर 2.0 का केलं? भर पत्रकार परिषदेत भारतानं पाकड्यांना उघडं पाडलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com