afghanistan cricket team twitter
Sports

AFG vs SA: अफगाणिस्तानला खराब मॅनेजमेंटचा फटका? 4 तास फ्लाईट लेट अन् खेळाडूंना 1 तास झोप; राशिदचा धक्कादायक खुलासा

Rashid Khan Statement, AFG vs SA: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील पहिल्या सेमिफायनलमध्ये अफगाणिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सेमिफायनलचा पहिला सामना अफगाणिस्तान आण दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दक्षिण आफ्रिकेने या सामन्यात एकतर्फी विजयाची नोंद करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राशिद खानचा हा निर्णय पूर्णपणे फसला. कारण अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजी करताना ११.५ षटकात अवघ्या ५६ धावा करता आल्या. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज सुपरहीट ठरले. तर अफगाणिस्तानचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. ५७ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने ९ गडी राखून विजय मिळवला.

राशिद खान काय म्हणाला?

नाणेफेकीच्या वेळी राशिद खान म्हणाला की, ' आमची प्लाईट जवळपास ४ तास उशीराने होती. खेळाडूंना केवळ १ तास झोप घेता आली, हे मुळीच सोपं नाही. आम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. ही खेळपट्टी नवीन आहे. मधल्या फळीतील फलंदाजांना सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यांना चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. मात्र हे सोपं नसणार आहे.'

आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानचा प्रवास सेमिफायनलमध्ये समाप्त झाला असला तरीदेखील या संघाने क्रिकेट चाहत्यांचं मन जिंकलं आहे. या संपूर्ण स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने जिद्दीने खेळ केला आहे. गोलंदाज आणि फलंदाजांनी शानदार खेळ करुन दाखवला आहे. या संघाने या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघांना पराभूत केलं. सुपर ८ फेरीतील शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगलादेशला पराभूत करत सेमिफायनलमध्ये प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT