rohit sharma twitter
क्रीडा

On This Day: रोहित-विराटसह भारतीयांच्या मनात आजही सल, जिव्हारी लागणार्‍या त्या पराभवाची वर्षपूर्ती!

ICC ODI World Cup Final 2023: आजच्याच दिवशी भारतीय संघाने आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील फायनलचा सामना गमावला होता.

Ankush Dhavre

On This Day In Cricket: कुठलाही भारतीय क्रिकेट फॅन १९ नोव्हेंबर हा दिवस विसरू शकणार नाही. आजच नाही, तर इथून पुढे काही वर्षांनीही १९ नोव्हेंबर हा दिवस आला की, जुन्या आठवणी ताज्या होतील. याच दिवशी भारतीय संघासह कोट्यवधी भारतीय चाहत्यांनी दुसऱ्यांदा वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न पाहिलं होतं.

मात्र ऑस्ट्रेलियाने हे स्वप्न धुळीस मिळवलं. साखळी फेरीतील सामन्यांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी पराभव केला होता. त्यामुळे भारतीय फॅन्सला वाटलं होतं की, विजय आपलाच आहे. मात्र ऑस्ट्रेलियाने ही ट्रॉफी उंचावली

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळत असलेला भारतीय संघ या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. भारतीय संघाला सुरुवातीला मोठा धक्का बसला होता. शुभमन गिल ४ धावांवर माघारी परतला.

त्यानंतर रोहित शर्मा ४७ आणि विराट कोहलीने ५४ धावांची खेळी करत संघाचा डाव सांभाळला. मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर विकेट्सची रांग लागली. शेवटी केएल राहुलने १०७ चेंडूंचा सामना करत ६६ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २४० धावांपर्यंत मजल मारली. मात्र हे आव्हान ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी सहज पूर्ण करत चॅम्पियन होण्याचा मान पटकावला.

ट्रेविस हेड नडला

या सामन्यात एकटा ट्रेविस हेड भारतीय संघावर भारी पडला. त्याने धावांचा पाठलाग करताना १३७ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १५ चौकार आणि ४ षटकार खेचले होते. त्याला साथ देत मार्नस लाबुशेनने ५८ धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती.

या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा ट्रेविस हेड सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता. तर संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा विराट कोहली मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता.

बॉर्डर- गावसकर मालिकेला होणार सुरुवात

वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवाच्या ठीक १ वर्षानंतर आता भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची बॉर्डर- गावसकर मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये रंगणार आहे. आता भारतीय संघाला ही मालिका जिंकून वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलच्या पराभवाचा बदला घेण्याची संधी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vinod Tawde : '४० वर्षे निवडणुकीत...'; पैसे वाटप केल्याच्या आरोपावर विनोद तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाले...VIDEO

Maharashtra News Live Updates: अनिल देशमुख यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

IPL 2025 Mega Auction: वय वर्ष फक्त १८! IPL लिलावात या युवा खेळाडूंवर पडणार पैशांचा पाऊस

Pune Politics: पुण्यात माजी नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला, ६ दिवसांपूर्वी शरद पवार गटात केला होता प्रवेश

Sanjay Raut: अनिल देशमुखांवरील हल्ल्याप्रकरणी संजय राऊत संतापले, थेट फडणवीसांवर केले आरोप

SCROLL FOR NEXT