Cricket News Updates in Marathi: इंग्लंडचा स्टार खेळाडू ट्रेविस हेड सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ट्रेविस हेडच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे.
या मालिकेतील पहिल्याच सामन्यात हेडने वादळी खेळी करत १९ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यादरम्यान त्याने इंग्लंडसा स्टार गोलंदाज सॅम करनच्या एकाच षटकात ३० धावा कुटल्या. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने २० षटकअखेर १७९ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव १५१ धावांवर आटोपला. यासह ऑस्ट्रेलियाने हा सामना २८ धावांनी आपल्या नावावर केला.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर इंग्लंडने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने घेतलेला हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. कारण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. शॉर्ट आणि ट्रेविस हेडने इंग्लंडला दमदार सुरुवात करुन दिली.
या मालिकेसाठी इंग्लंड संघाची जबाबदारी फिल सॉल्टकडे सोपवण्यात आली आहे. या सामन्यात फिल सॉल्टने पाचवे षटक टाकण्यासाठी सॅम करनला गोलंदाजीला बोलावलं. या षटकातील पहिल्या चेंडूवर पुल शॉट मारत हेडने चौकार खेचला. षटकाची सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर देखील हेडने चौकार खेचला.
सलग २ चौकार खेचल्यानंतर पुढच्याच चेंडूवर मोठा फटका खेळत हेडने षटकार खेचला. त्यानंतर पुढील २ चेंडूंवर देखील त्याने षटकार खेचले. यासह त्याने लागोपाठ ३ चेंडूंवर ३ षटकार खेचले. दरम्यान शेवटच्या चेंडूवरही त्याने चौकार मारला. यासह हेडने सॅम करनच्या षटकात एकूण ३० धावा गोळा केल्या.
या तुफान फटकेबाजीच्या बळावर हेडने अवघ्या २३ चेंडूंच्या बळावर ५९ धावांची खेळी करत वेगवान अर्धशतक झळकावलं. या खेळीदरम्यान हेडने ८ चौकार आणि ४ गगनचुंबी षटकार खेचले. हेडने केवळ टी-२० क्रिकेटमध्ये नव्हे, तर वनडे क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमध्येही आपली छाप सोडली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.