Tokyo Olympics: हॉकीत भारताची 41 वर्षांची पदकाची प्रतीक्षा संपली ब्रॉन्झ पदकाची कमाई  Saam Tv
Sports

Tokyo Olympics: हॉकीत भारताची 41 वर्षांची पदकाची प्रतीक्षा संपली ब्रॉन्झ पदकाची कमाई

भारताचा पुरुष हॉकी संघ ऑलिम्पिकमध्ये ४१ वर्षांनंतर पदक मिळवण्याच्या इराद्यासह जर्मनी विरोधात सामन्यामध्ये मैदानात उतरला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tokyo Olympics : भारताने ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये हॉकी पदक जिंकले आहे. याअगोदर, भारताने वासुदेवन भास्करन यांच्या नेतृत्वाखाली १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आजच्या या रंजक सामन्यात सिमरनजीत सिंगने भारतासाठी २ गोल केले, हरमनप्रीत सिंग, रुपिंदर पाल सिंग आणि हार्दिक सिंह यांनी प्रत्येकी १ गोल केला आणि या सामन्यात संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे.

भारताने या सामन्यात खराब सुरुवात केली आणि जर्मनीने सामन्याच्या पहिल्याच मिनिटाला गोल करून ०- १ अशी आघाडी घेतली होती . तैमूर ओरुजने जर्मनीसाठी हा गोल केला आहे. पाचव्या मिनिटाला भारताला पुनरागमन करण्याची संधी मिळाली पण रुपिंदर पाल सिंगला पेनल्टी कॉर्नरमध्ये रुपांतर करण्यात अपयश आले आहे. पहिल्या क्वार्टरच्या समाप्तीनंतर जर्मनीने भारतावर ०- १ अशी आघाडी कायम राखली होती.

हे देखील पहा-

मात्र, भारताचा गोलरक्षक श्रीजेशचे या क्वार्टरमध्ये काही चमकदार बचाव बघायला मिळाले. दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला भारताने शानदार पुनरागमन केले आणि १७ व्या मिनिटाला सिमरनजीत सिंगच्या शानदार मैदानी गोलमुळे सामना १- १ बरोबरीत आणला होता. परंतु यानंतर जर्मनीने भारतीय बचावावर दबाव आणण्यास सुरुवात केली आणि २ मिनिटांच्या अंतरात २ गोल करत भारतावर ३- ० अशी आघाडी घेतली आहे.

हार्दिक सिंहने या सामन्यामध्ये भारताला तिसऱ्या क्वार्टरमध्ये पुनरागमन करत आणि २६ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर करून स्कोर २- ३ केला होता. यानंतर भारताने पुन्हा एकदा शानदार पुनरागमन केले आणि जर्मनीच्या बचावावर सतत दबाव ठेवला होता. २८ व्या मिनिटाला त्याला २ पेनल्टी कॉर्नर मिळाला होता, यावेळी हरमनप्रीत सिंगच्या ड्रॅग फ्लिकने भारताला ३- ३ ने बरोबरीत रोखले होते.

रुपिंदर पाल सिंगने ३१ व्या मिनिटाला भारताकरिता ४ गोल केला. रुपिंदर पाल सिंगने पेनल्टी स्ट्रोकवर हा गोल करत संघाला ४- ३ ने पुढे केले होते. ३ मिनिटांनंतर, ३४ व्या मिनिटाला सिमरनजीत सिंगने शानदार मैदानी गोल करत भारताला या सामन्यात ५- ३ अशी आघाडी मिळवून दिली आहे. चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीपासूनच जर्मनीने आक्रमक हॉकी खेळून भारतावर दबाव आणण्यास सुरुवात केली. जर्मनीने ४ गोल करत पुन्हा एकदा हा सामना ५- ४ च्या स्कोअरसह रोमांचक वळणावर आणला होता.पण अखेर शेवटी भारताने हा सामना ५- ४ ने जिंकत इतिहास रचला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT