new zealand  twitter
Sports

NZ vs SL: किवी गोलंदाजांसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले; विजयासाठी दिलं १७२ धावांचं आव्हान

New Zealand vs Srilanka: हा सामना सेमीफायनलमध्ये जाण्याच्या दृष्टीने न्यूझीलंड संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

Ankush Dhavre

New Zealand vs Srilanka:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ४१ वा सामना श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान हा निर्णय योग्य ठरवत न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली. श्रीलंकेचा डाव ४६.४ षटकात १७१ धावांवर संपुष्टात आला आहे. तर न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी १७२ धावांची गरज आहे.

श्रीलंकेचा डाव १७१ धावांवर संपुष्टात..

या डावात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेला चांगली सुरुवात करता आली नाही. कारण ३ धावांवर श्रीलंकेला पहिला धक्का बसला. पथूम निसंका अवघ्या २ धावांवर माघारी परतला. त्यानंतर कुसल परेराने एक बाजू धरून ठेवली.

त्याने या डावात २२ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. हे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतक ठरले आहे. शेवटी महिश थिक्षाणाने नाबाद ३८ धावांची खेळी केली. या दोघांना वगळलं तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता नाही. (Latest Sports updates)

न्यूझीलंडच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी..

फलंदाजीसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीवर न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना ट्रेन्ट बोल्टने सर्वाधिक ३, तर लॉकी फर्ग्युसनने २, मिचेल सँटनरने २ आणि रचिन रविंद्रने २ गडी बाद केले. हा सामना जिंकून न्यूझीलंडला वर्ल्डकप स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित करण्याची संधी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Crime : एटीएममधून पैसे चोरीचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेने अडकला, चोरटा पोलिसांच्या ताब्यात

Maharashtra Live News Update: शिवसेना उबाठाचे गोकुळ दूध संघावर भ्रष्टाचाराचे आरोप

Ananya Panday: अनन्या पांडेचा मीडियासमोर फोटो काढण्यास नकार, कारणही सांगितलं, म्हणाली- मी ५ वाजता उठले...

पोलीस कॉन्स्टबलचा रस्ते अपघातात मृत्यू, बातमी कळताच पत्नीला मोठा धक्का, निराशेतून धक्कादायक पाऊल

Hardik Pandya: हार्दिक पंड्याच्या घड्याळाची किंमत आशिया कपच्या प्राइज मनीपेक्षा ८ पट जास्त; किंमत ऐकून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT