Michael Bracewell Catch Saam Tv
Sports

Michael Bracewell Catch: अफलातून! न्यूझीलंडच्या पठ्ठ्याने चित्त्याच्या चपळाईने घेतला भन्नाट झेल, पाहा व्हिडीओ

सामन्याच्या पहिल्या दिवशी चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे ब्रेसवेलने टिपलेला अप्रतिम झेल

Ankush Dhavre

Michael Bracewell Catch: इंग्लंड संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना वेलिंग्टनच्या मैदानावर सुरु आहे.

सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत इंग्लंड संघाने ३ गडी बाद ३१५ धावा केल्या आहेत. मुख्य बाब म्हणजे इंग्लंडचे ३ फलंदाज अवघ्या २१ धावसंख्येवर माघारी परतले होते.

दरम्यान सामन्याच्या पहिल्या दिवशी चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे ब्रेसवेलने टिपलेला अप्रतिम झेल. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest Sports Updates)

सामन्याच्या पहिल्या दिवशी सातवे षटक टाकण्यासाठी टीम साऊदी गोलंदाजीला आला होता. या षटकातील चौथा चेंडू त्याने ऑफ साईडच्या दिशेने टाकला. ज्यावर फलंदाजी करत असलेल्या डकेटने लांबूनच ड्राइव्ह करण्याचा प्रयन्त केला.

मात्र हा प्रयत्न फसला. कारण चेंडू बॅटचा कडा घेत सरळ स्लिपच्या दिशेने गेला. हा चेंडू स्लिपला क्षेत्ररक्षण करत असलेल्या ब्रेसवेलपासून दूर होता. मात्र त्याने डाइव्ह मारत एकहाती भन्नाट झेल टिपला.

न्यूझीलंड संघासाठी हा आनंद साजरा करण्यासाठी एकमेव क्षण ठरला. कारण त्यानंतर इंग्लिश फलंदाजानी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. इंग्लंडचे फलंदाज धावांचा पाऊस पाडत असताना पावसाने हजेरी लावली.

त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ ६५ षटकांनंतर थांबवण्यात आला. पहिल्या दिवसाच्या अखेर इंग्लंड संघाने ३ गडी बाद ३१५ धावा केल्या आहेत. जो रूट १०१ धावांवर तर हॅरी ब्रुक नाबाद १८४ धावांवर फलंदाजी करत आहेत. या डावात इंग्लंड संघाकडे मोठी धावसंख्या उभी करण्याची संधी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट; विजेच्या शॉक लागून तरूणाचा मृत्यू, ४ गंभीर जखमी, रात्री नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा विसर्जनासाठी समुद्रात दाखल

Reviver Upay: रविवारी हे उपाय बदलतील तुमचं आयुष्य; सर्व समस्यांपासून मिळेल मुक्तता

Tithal Beach : पावसाळ्यात 'तिथल' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

'Bigg Boss 19'च्या सदस्याने नॅशनल TVवर दिली प्रेमाची कबुली; गुडघ्यावर बसून केला प्रपोज, पाहा रोमँटिक VIDEO

SCROLL FOR NEXT