pakistan twitter
Sports

Champions Trophy: गाडी नंबर ४२० पकडा अन् सरळ घरी... पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडताच सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

Viral Memes On Social Media After NZ vs BAN Match: न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील सामना झाल्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.

Ankush Dhavre

तब्बल २९ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पाकिस्तानला आयसीसीच्या स्पर्धेचे यजमानपद भुषवण्याची संधी मिळाली होती. या स्पर्धेच्या आयोजनासाठी पाकिस्तानने नव्याने स्टेडियमची उभारणी केली होती. पीसीबीने ४ महिन्यात स्टेडियम बनवून तयार केले. त्यानंतर १९ फेब्रुवारीला या स्पर्धेचा ओपनिंग सोहळा पार पडला आणि २४ फेब्रुवारीला पाकिस्तानचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडला. पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर पडायला ६ दिवसही लागले नाहीत. त्यामुळे बांगलादेशचा संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर, पाकिस्तानलाही जोरदार ट्रोल केलं जात आहे.

बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या बांगलादेशला ५० षटकअखेर ९ गडी बाद २३६ धावा करता आल्या. त्यानंतर न्यूझीलंडकडून फलंदाजीसाठी आलेल्या रचिन रविंद्रने ११२ धावांची शानदार खेळी केली.

या खेळीच्या बळावर न्यूझीलंडने बांगलादेशवर एकतर्फी विजयाची नोंद केली. या विजयासह भारत आणि न्यूझीलंडचा संघ स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये जाऊन पोहोचला आहे. तर बांगलादेश आणि पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

यजमान संघ स्पर्धेतून बाहेर

न्यूझीलंडच्या विजयामुळे भारतीय संघाला मोठा फायदा झाला आहे. भारतीय संघ तिसरा सामना खेळण्यापूर्वी सेमीफायनलसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे यजमान संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडताच सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.

सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

बांगलादेशच्या पराभवानंतर पाकिस्तानलाही ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. कारण, हा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. एका युझरने लिहिले की, ' बांगलादेशी टायगर्सला आयसीसीच्या स्पर्धेतून बॅन करा. हे बांगलादेशच्या बाहेर खेळतानाही जिंकू शकत नाही.' तर आणखी एका युझरने लिहिले की, ' बांगलादेशचा संघ स्पर्धेत इतर संघांना २ गुण गिफ्ट म्हणून घेण्यासाठी सहभाग घेतो...' हे सर्व पोस्ट शेअर करणारे, पाकिस्तानी फॅन्स आहेत. जे पोस्ट शेअर करुन आपला संताप व्यक्त करताना दिसून येत आहेत. कारण पाकिस्तानला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बांगलादेशचं जिंकणं महत्वाचं होतं. त्यामुळे पाकिस्तानी फॅन्स संतप्त प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

SCROLL FOR NEXT