jay shah yandex
Sports

IPL 2025: IPL खेळाडू मालामाल होणार! जय शहा यांची मोठी घोषणा

Jay Shah Announcement: बीसीसीआय सचिव जय शहा यांनी आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी मोठी घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

Jay Shah Announcement, IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयपीएल गव्हर्निंग कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत आयपीएल २०२५ स्पर्धेच्या दृष्टीने काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. जय शहा यांनी आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंसाठी एक मोठी घोषणा केली आहे. आता या स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना काँक्ट्रॅकच्या रकमेसह प्रत्येक सामन्याची मॅच फी म्हणून ७.५ लाख रुपये दिले जाणार आहेत.

जय शहा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी लिहिले की, ' आयपीएल स्पर्धेत सातत्याने शानदार कामगिरीच्या केल्याचा जल्लोष म्हणून एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. आमच्या क्रिकेटपटूंना प्रत्येक सामन्यासाठी ७.५ लाख रुपये मॅच फी म्हणून दिले जाणार आहेत. जर एखादा खेळाडू हंगामातील सर्व सामने खेळणार असेल तर, त्याला कॉन्ट्रॅक्ट अमाऊंटसह १.०५ कोटी रुपये मॅच फी म्हणून दिले जातील.'

ही आयपीएलच्या नव्या युगाची सुरुवात असल्याचं जय शहा यांनी म्हटलं आहे. तसेच आगामी हंगामात सर्व खेळाडूंना मॅच फी देण्यासाठी फ्रेंचायझींना १२.६० कोटी रुपये दिले जाणार आहेत. असं जय शहा यांनी म्हटलं आहे. यापूर्वी खेळाडूंना केवळ कॉन्ट्रॅक्ट केलेली अमाऊंट दिली जायची. मात्र आता खेळाडूंना कॉन्ट्रॅक्ट अमाऊंटसह अतिरिक्त अमाऊंट दिली जाणार आहे.

कोलकाताने मारली बाजी

आयपीएल २०२४ स्पर्धेत सर्व संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स आणि पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद संघाने या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला होता. शेवटी कोलकाता नाईट रायडर्स संघाने बाजी मारली आणि तिसऱ्यांदा आयपीएल स्पर्धेची ट्रॉफी उंचावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT