भारताचा न्यूझीलंडविरुद्ध झालेला पराभव हा न पचणारा आहे. जे भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कधीच घडलं नव्हतं, ते या मालिकेत घडलं. त्यामुळे दिग्गज खेळाडूंकडून भारतीय खेळाडूंवर टीकेचा वर्षाव केला जातोय. तर पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अकरम म्हणतोय, की पाकिस्तानचा संघही भारतीय संघाला हरवू शकतो.
पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यादरम्यान वसीम अकरम समालोचन करत होता. त्यावेळी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन देखील समालोचनकक्षात होता. दरम्यान दोघांमध्ये भारत - न्यूझीलंड कसोटी मालिकेबाबत चर्चा सुरु होती.
ही चर्चा सुरु असताना मायकल वॉन म्हणाला की, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये १ कसोटी मालिका व्हायला हवी. यावर उत्तर देत वसीम अकरम म्हणाला की, क्रिकेटची आवड असणाऱ्या दोन्ही देशांसाठी नक्कीच ही आनंदाजी बाब असेल. भारतातील स्पिनिंग ट्रॅकवर पाकिस्तानचा संघ भारतीय संघाला पराभूत करु शकतो. भारताला न्यूझीलंडने मायदेशात खेळताना ०-३ ने हरवलंय.'
भारतीय संघावर जहरी टिका करणाऱ्या वसीम अकरमच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच बांगलादेशने घरात घूसून पाकिस्तानला धूळ चारली होती. न्यूझीलंडचा संघ हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मजबूत संघांपैकी एक आहे.
त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टफ फाईट झाली आणि शेवटी न्यूझीलंडने बाजी मारली. पण बांगलादेश हा तितका मजबूत संघ नाही. तरीसुद्धा बांगलादेशने मायदेशात येऊन पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली.

सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.