novak djokovic saam tv
क्रीडा

Novak Djokovic: जगज्जेता जोकोविच! नदाल, फेडररला मागे सोडत बनला नंबर 1

French Open 2023: सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने (Novak Djokovic) फ्रेंच ओपन २०२३ स्पर्धा जिंकून इतिहास रचला आहे.

Ankush Dhavre

Novak Djokovic Record: सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने (Novak Djokovic) फ्रेंच ओपन २०२३ स्पर्धा जिंकून इतिहास रचला आहे. रविवारी (११ जून) पार पडलेल्या पुरुष एकेरी स्पर्धेतील अंतिम सामन्यात त्याने नॉर्वेच्या कॅस्पर रूडचा (Casper Rudd) धुव्वा उडवत जेतेपदाला गवसणी घातली आहे.

त्याने अंतिम सामन्यात कॅस्पर रूडचा ७-६, ६-३, ६-५ ने पराभव केला आहे. यासह त्याने तिसऱ्यांदा फ्रेंच ओपन स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला नोवाक जोकोविच ग्रँड स्लॅम स्पर्धेतील ३४ वा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. तर कॅस्पर रूडचा हा तिसरा सामना होता.

जोकोविचने मोडला राफेल नदालचा रेकॉर्ड..

नोवाक जोकोविचने या स्पर्धेचे जेतेपद मिळवताच राफेल नदालचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. नोवाक जोकोविचचे हे विक्रमी २३ वे ग्रँड स्लॅम ठरले आहे. तर राफेल नदालच्या नावे २२ ग्रँड स्लॅम जिंकण्याची नोंद आहे. या यादीत तिसऱ्या स्थानी रॉजर फेडरर आहे. रॉजर फेडररच्या नावे २० ग्रँड स्लॅम जिंकण्याची नोंद आहे.

सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारे खेळाडू..

नोवाक जोकोविच: २३

राफेल नदाल: २२

रॉजर फेडरर: २०

तिसऱ्यांदा जिंकलं फ्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद..

ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन स्पर्धेत नोवाक जोकोविचचा दबदबा पाहायला मिळाला आहे. त्याने आतापर्यंत सर्वाधिक १० वेळेस ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. तर विम्बल्डन स्पर्धेत त्याने ७ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे. तर युएस ओपन आणि फ़्रेंच ओपन स्पर्धेत त्याने प्रत्येकी ३-३ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे. (Latest sports updates)

नोवाक जोकोविचने जिंकलेले ग्रँड स्लॅम..

ऑस्ट्रेलियन ओपन: १०

फ्रेंच ओपन: ३

विम्बलडन: ७

यूएस ओपन: ३

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

SCROLL FOR NEXT