novak djokovic saam tv
Sports

Australian Open 2022: नोव्हाक जोकोविचवर संक्रात; व्हिसा रद्द, देशातून हाेईल हकालपट्टी

जर त्याने या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले नाही किंवा तसे करण्यात तो अयशस्वी ठरला तर त्याला ताबडतोब देशातून हद्दपार केले जाईल असे सांगितलं जात आहे.

साम न्यूज नेटवर्क

ऑस्ट्रेलिया : येत्या साेमवारपासून ऑस्ट्रेलियन ओपन सुरू होत आहे. या स्पर्धेतून नोव्हाक जोकोविच स्पर्धेतून बाहेर राहील अशी परिस्थिती पुन्हा एकदा त्याच्यावर आली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे ऑस्ट्रेलियन इमिग्रेशन मंत्री अ‍ॅलेक्स हॉक यांनी जोकोविचचा व्हिसा रद्द केला आहे. मंत्री महाेदय यांनी त्यांच्या वैयक्तिक अधिकाराचा वापर करीत ही कार्यवाही केली आहे. दरम्यान जोकोविच (novak djokovic) यांच्या वकीलांनी कायदेशीर पर्यायांचा विचार सुरु केलेला आहे. (novak djokovic visa cancelled )

मॉरिसन सरकार ऑस्ट्रेलियाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी विशेषत: कोविड-१९ (covid19) साथीच्या आजाराच्या संदर्भात दृढपणे वचनबद्ध आहे. त्यामुळे हा निर्णय घेताना आम्ही काळजीपुर्वक सर्व गाेष्टींचा विचार केल्याचे ऑस्ट्रेलियन इमिग्रेशन मंत्री अ‍ॅलेक्स हॉक यांनी नमूद केले आहे.

दरमन्यान आजच्या निर्णयामुळे जोकोविचला तीन वर्षांसाठी ऑस्ट्रेलियात पुन:प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित केले जाऊ शकते. जोकोविचचे वकील अजूनही त्यांच्या कायदेशीर पर्यायांचा विचार करत आहेत. हॉक यांच्या निर्णयानंतर वकीलांना कागदपत्रे देण्यात आली आहेत. त्यांनी अपील केल्यास. लेखी म्हणणे मांडणे आणि ताेंडी युक्तीवादासाठी वेळ हवा आहे. रविवारपर्यंत संबंधित खटला पूर्ण हाेणे आवश्यक आहे अन्यथा सोमवारपासून सुरू होत असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन (australian open) स्पर्धेस जाेकाेविच मुकणार हे स्पष्ट हाेत आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai High Court: कबुतरखान्यावरून मराठीविरुद्ध जैन; हायकोर्टाकडून बंदी कायम

Adult Video: शाळेच्या वर्ग सुरू असतानाच एलईडी स्क्रीनवर लागला पॉर्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Hair Care Tips: आठवड्यातून केसांना कितीवेळा तेल लावावे?

Tuljapur Tulja Bhavani Mandir : तुळजा भवानी मंदिराचा गाभारा पाडणार? मंदिर जीर्णोद्धावरुन तुळजापुरात राडा

Pune Crime: पैशांची मागणी, वारंवार शिवीगाळ; तरुणीचं डोकं फिरलं, रॉडने मारहाण करत तरुणाला संपवलं

SCROLL FOR NEXT