Kamal Khan: पत्रकार कमाल खान यांच्या निधनाची बातमी अस्वस्थ करणारी; देशातील नेत्यांची भावना

कमाल खान यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर श्रद्धांजली वाहत आहेत.
kamal khan
kamal khansaam tv
Published On

उत्तर प्रदेश : ज्येष्ठ पत्रकार कमाल खान (६१) यांचे निधन झाले आहे. लखनौ येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कमाल खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. खान यांना रुग्णालयात नेण्यात आले हाेते परंतु त्यापुर्वीच त्यांची प्राणज्याेत मालवली हाेती. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी खान यांच्या मृत्यूची घोषणा केली. (senior journalist kamal khan passes away)

कमाल खानचे लग्न पत्रकार रुचि कुमार यांच्याशी झाले होते. बटलर पॅलेस, लखनौ येथे असलेल्या बंगल्यात ते कुटुंबासह राहत होते. शुक्रवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना अदारांजली वाहिली. (kamal khan marathi news)

कमाल खान (kamal khan) यांच्या निधनावर समाजवादी पक्षाने शोक व्यक्त केला आहे. पक्षाने ट्विट (tweet) करुन कमाल खान यांचे जाणे म्हणजे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो असे म्हटलं आहे. काँग्रेसने (congress) ट्विट करुन कमाल खान यांच्या कुटुंबीयांना हे अपरिमित नुकसान सहन करण्याची शक्ती देवो असे म्हटलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath) यांनी ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. कमाल खान यांच्या कुटुंबाप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.

मायावती यांनी ट्विट करुन पत्रकार कमाल खान यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्या लिहितात पत्रकार कमाल खान यांच्या जाण्याने पत्रकारिता जगतासाठीच नव्हे तर सर्वांसाठीच अत्यंत दुःखद बातमी आहे. कमाल खान यांचे जाण्याने कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.

kamal khan
Tasnim Mir: १६ वर्षीय तसनीम मीरने रचला इतिहास, पीव्ही सिंधू-सायना नेहवालही करू शकले नव्हते

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार कमाल खान यांच्या निधनाची बातमी अस्वस्थ करणारी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असे ट्विट करुन अदारांजली वाहिली आहे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com