Wimbeldon 2023: टेनिस विश्वात मानाची समजली जाणारी विम्बल्डन २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी पार पडला. या सामन्यात नोवाक जोकोविच आणि कार्लोस अल्कारेझ हे दोन खेळाडू आमने सामने आले होते. या सामन्यात अनुभवी नोवाक जोकोविचला जेतेपद मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं.
मात्र अंतिम लढतीत कार्लोस अल्कारेझने दमदार खेळ करत नोवाक जोकोविचला पराभूत केलं आणि जेतेपदाला गवसणी घातली आहे.
दरम्यान हा सामना सुरु असताना नोवाक जोकोविच असे काहीतरी कृत्य करताना दिसून आला आहे ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.
जोकोविचला राग अनावर
नोवाक जोकोविच पाचवा सेट गमावल्यानंतर रागात रॅकेट तोडताना दिसून आला आहे. त्याने रॅकेट इतक्या जोरात आपटला की, रॅकेटचे दोन तुकडे झाल्याचे पाहायला मिळाले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.
मोठा विक्रम करण्याची संधी हुकली..
नोवाक जोकोविचने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत २३ ग्रॅंडस्लॅम जिंकले आहेत. तर २४ वे ग्रॅंडस्लॅम जिंकण्यासाठी त्याला आणखी वाट पाहावी लागणार आहे. त्याला सलग पाचवे ग्रॅंडस्लॅम जिंकण्याची संधी होती. मात्र त्याची ही संधी हुकली आहे. (Latest sports updates)
जोकोविचला पराभूत करणारा कार्लोस अल्कारेझ आहे तरी कोण?
कार्लोस अल्कारेझ हा स्पेनमधील एल परमार या गावात राहतो. त्याचा जन्म ५ मे २००३ रोजी झाला. कार्लोस अल्कारेझचे वडील टेनिस फॅसिलिटी सेंटर चालवायचे. इथूनच त्याला टेनिसचं प्रशिक्षण मिळालं.
युरोप आणि स्पेनमध्ये त्याने अनेक स्पर्धा जिंकल्या. वयाच्या १६ व्या वर्षी त्याने रामोस विनोलासला पराभूत करत एटीपी स्पर्धेतील पहिला सामना जिंकला होता. त्याला घडविण्यात माजी नंबर १ खेळाडू जुआन कार्लोसने मोलाची भूमिका बजावली आहे. कार्लोस अल्कारेझलने नोवाक जोकोविचला पराभूत करण्यापूर्वी राफेल नदालला देखील पराभूत केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.