not rohit sharma not virat kohli shakib al hasan scored most runs in world cup amongst active players  Saam tv news
Sports

World Cup 2023: काय सांगता? विराट, रोहित नव्हे तर या फलंदाजाने वर्ल्डकपमध्ये केल्या आहेत सर्वाधिक धावा

Most Runs In World Cup: वर्ल्डकपमध्ये कोणी केल्या आहेत सर्वाधिक धावा? जाणून घ्या.

Ankush Dhavre

Most Runs In World Cup:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्याने या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत विराट कोहली, रोहित शर्मा, जोस बटलर, केन विलियमसन आणि स्टीव्ह स्मिथसारखे स्टार फलंदाज खेळताना दिसून येणार आहेत.

हे फलंदाज धावांचा पाऊस पाडतील यात काहीच शंका नाही. मात्र तुम्हाला माहितेय का,आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असणाऱ्या फलंदाजांमध्ये वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कोण?जाणून घ्या.

कोणी केल्या आहेत सर्वाधिक धावा?

वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनच्या नावे आहे. त्याने २९ डावांमध्ये फलंदाजी करताना ४५.८४ च्या सरासरीने ११४६ धावा केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असणाऱ्या फलंदाजांमध्ये ही सर्वाधिक धावसंख्या आहे. यादरम्यान त्याने १० अर्धशतके आणि २ शतके झळकावली आहेत.

तर भारतीय संघातील अनुभवी फलंदाज विराट कोहली या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. विराटने २ शतके आणि ६ अर्धशतकांसह १०३० धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. वर्ल्डकप स्पर्धेतील १८ डावांत त्याने ६२ च्या सरासरीने ९९२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ अर्धशतके आणि ४ शतके झळकावली आहेत.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत चौथ्या स्थानी आहे. रोहितने आतापर्यंत खेळलेल्या १७ डावांत ६५.२ च्या सरासरीने ९७८ धावा केल्या आहेत. ज्यात ६ शतके आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे. आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ही आकडेवारी वाढेल. (Latest sports updates)

वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सक्रिय असलेले फलंदाज)

शाकिब अल हसन - ११४६ धावा

विराट कोहली - १०३० धावा

डेव्हिड वॉर्नर - ९९२ धावा

रोहित शर्मा - ९७८ धावा

केन विलियमसन - ९११ धावा

मुश्फिकुर रहीम -८७७ धावा

स्टीव्ह स्मिथ- ८३४ धावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi Ladoo: लहान मुलं मेथीचे लाडू खायला नकार देतात? मग 'ही' ट्रिक वापरा आणि पाहा जादू!

Bluetooth Security: ब्लूटूथ हेडफोन, इअरबड्स वापरणाऱ्या मोठा धोका, सरकारने जारी केला इशारा

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

SCROLL FOR NEXT