gautam gambhir google
क्रीडा

Team India Head Coach: 48 तासात होऊ शकते टीम इंडियाच्या नव्या हेड कोचची घोषणा! गंभीरसह हा दिग्गजही शर्यतीत

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा ही राहुल द्रविड यांच्यासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून शेवटची संधी असणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर त्यांचा मुख्यप्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. भावी मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी भारतीय खेळाडू गौतम गंभीरचं नाव आघाडीवर आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२३ स्पर्धा झाल्यानंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला होता.

बीसीसीआयने या पदासाठी अर्ज मागवले होते. सुरुवातीला अनेक दिग्गज खेळाडूंची नावं समोर आली होती. त्यानंतर केवळ गौतम गंभीरनेच अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली होती. मंगळवारी बीसीसीआयच्या मॅनेजमेंटकडून गौतम गंभीरची मुलाखत घेण्यात आली. मात्र एकट्या गंभीरने नव्हे, तर माजी भारतीय फलंदाज डब्ल्यूवी रमन यांची देखील मुलाखत घेण्यात आली.

यापूर्वी त्यांनी भारतीय महिला संघासाठी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली आहे. यासह बंगाल आणि तामिळनाडू या संघांना देखील प्रशिक्षण दिलं आहे. तसेच त्यांनी पंजाब किंग्ज संघासाठी सहाय्यक प्रशिक्षक आणि केकेआरसाठी फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका देखील पार पाडली आहे.

बीसीसीआयच्या एका सुत्राने सांगितले की, ' हो, गंभीरने सीएसीला मुलाखत दिली. आज पहिल्या टप्प्यातील चर्चा झाली. तर उद्या दुसऱ्या टप्प्यातील चर्चा पार पडू शकते. गौतम गंभीरनंतर रमन यांची मुलाखत घेण्यात आली. या दोन्ही मुलाखती झुम कॉलवर घेण्यात आल्या. ही मुलाखत तब्बल ४० मिनिटं सुरु राहिली.' मिळालेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरची नियुक्ती जवळजवळ निश्चित आहे. येत्या ४८ तासात नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली जाऊ शकते. याचा अर्थ असा की, येत्या ४८ तासांत भारतीय संघाला नवा मुख्य प्रशिक्षक मिळू शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya : मेषसह 5 राशींच्या भाग्यात होणार मोठा बदल, वाचा राशीभविष्य

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT