Rohit Sharma honorary doctorate saam tv
Sports

Rohit Sharma: हिटमॅन नाही आता ‘डॉक्टर’ रोहित शर्मा! भारताच्या माजी कर्णधाराला मानद डॉक्टरेट

Rohit Sharma honorary doctorate: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कॅप्टन रोहित शर्मा याला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात येणार आहे. "हिटमॅन" म्हणून ओळखला जाणारा रोहित आता "डॉक्टर रोहित शर्मा" संबोधला जाणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

माजी भारतीय कर्णधार आणि महान फलंदाज रोहित शर्माला त्याची क्रिकेट कारकिर्द आणि उत्कृष्ट नेतृत्व कौशल्यासाठी एक मोठा सन्मान मिळणार आहे. पुण्यातील अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ (एडीवायपीयू) त्यांच्या १० व्या दीक्षांत समारंभात रोहित शर्माला मानद डॉक्टरेट (डी.लिट.) प्रदान करणार आहेत.

अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाने बुधवारी अधिकृतपणे याची घोषणा केली. हा दीक्षांत समारंभ शनिवारी पुण्यात होणार आहे. हा एक भव्य आणि स्टार-स्टडेड कार्यक्रम असून यामध्ये रोहित शर्माकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठाने याबाबत निवेदन जारी केलंय. यामध्ये म्हटलंय की, "क्रिकेट चाहते त्याला 'हिटमॅन' म्हणून ओळखतात, परंतु हा दीक्षांत समारंभ रोहित शर्माच्या आयुष्यातील एक अनोखा आणि विशेष टप्पा असणार आहे."

या समारंभाचे अध्यक्षपद अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष आणि कुलपती डॉ. अजिंक्य डीवाय पाटील यांच्याकडे असणार आहे. क्रिकेटमधील अतुलनीय योगदानासाठी आणि जागतिक स्तरावर प्रेरणादायी नेतृत्वासाठी रोहित शर्माला सन्मानित केलं जाणार आहे.

अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठाने म्हटलंय की, टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा संयम, रणनीती आणि मानसिक शक्ती यांसारख्या मूल्यांचं एक प्रतिक आहे. जे २०२६ च्या पदवीधर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत देखील आहेत. या गुणांची दखल घेत रोहितला ही मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात येतेय. रोहित शर्मा व्यतिरिक्त या दीक्षांत समारंभात समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या इतर प्रतिष्ठित व्यक्तींचाही सन्मान केला जाणार आहे.

टेस्ट आणि 20I मधून रोहित निवृत्त

३८ वर्षीय रोहित शर्माने टेस्ट क्रिकेट आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे सध्या तो वनडे क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतोय. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ऐतिहासिक कामगिरी केलीये.

रोहित शर्माने आतापर्यंत भारतासाठी ५०८ सामने खेळले आहेत. या काळात त्याने ४२.३३ च्या सरासरीने आणि ८७.३४ च्या स्ट्राईक रेटने २०१०९ रन्स केलेत. रोहितचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम स्कोर २६४ आहे. त्याने ५० शतकं आणि १११ अर्धशतकं केली आहेत. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६५० सिक्स आणि १९४६ चौकार मारले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूरमध्ये ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, आरोपीला पोलीस कोठडी; कोर्टात काय झालं?

मुंबईतील लोकल ट्रेनची गर्दी २ महिन्यात कमी होणार; रेल्वे प्रशासनाने दिली महत्वपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: बीडच्या परळी नगर परिषदेच्या प्रशासनाला पडला बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचा विसर

Vatana Batata Rassa Bhaji: घरच्या घरी बनवा हॉटेलसारखी झणझणीत वटाणा-बटाटा रस्सा भाजी! पाहा ही सोपी रेसिपी

घरात टाकली धाड; 61 किलो चांदी अन् नोटांचा डोंगर पाहून पोलीस आयुक्तांचे डोळे झाले पांढरे

SCROLL FOR NEXT