आयपीएल २०२६ पूर्वी रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या होम ग्राऊंडवरून जोरात चर्चा सुरु आहेत. यामध्ये आयपीएलच्या आगामी सिझनसाठी आरसीबी त्याच्या होम ग्राऊंडवरील सामने वेगळ्या दोन वेन्यूवर खेळवण्याची शक्यता आहे. गतविजेची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू येणाऱ्या आयपीएल २०२६ सिझनसाठी त्यांच्या होम ग्राउंडसाठी दोन वेगवेगळ्या मैदानांबाबत विटार करत असल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, RCB चं होम ग्राउंड नवी मुंबईत असणार आहे. तर यावेळी त्यांचे काही सामने रायपूरमध्येही खेळवले जाण्याची शक्यता आहे.
आयपीएल २०२६ मध्ये आरसीबीची टीम त्यांचे होम ग्राऊंडवरील सामने एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर न खेळवता इतर दुसऱ्या वेन्यूवर खेळवणार आहे. टाईम्सस ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, आरसीबी त्यांच्या होम ग्राऊंडवरील सामने नवी मुंबई किंवा रायपूरमध्ये शिफ्ट करण्यात येऊ शकतात.
ही बातमी केवळ आरसीबीच्या चाहत्यांसाठी धोकादायक नाहीये तर यामुळे आयपीएलच्या वेन्यूच्या ठरावाबाबत देखील प्रश्न उपस्थित झालं आहे. चिन्नस्वामी स्टेडियम आणि आरसीबी यांचं जुनं नातं आहे. गेल्यावर्षी आयपीएल २०२५ चा खिताब आरसीबीने चिन्नस्वामी स्टेडिममध्ये जिंकला होता. मात्र यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल ११ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे आता आरसीबीला होम ग्राऊंड बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला.
नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम आणि रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियम या दोन्ही जागा जागतिक दर्जाच्या सुविधांसाठी प्रसिद्ध आहेत. डीवाय पाटील स्टेडियमने यापूर्वी अनेक यशस्वी आयपीएल सामने आयोजित केलेत. याशिवाय याठिकाणच्या खेळपट्ट्या फलंदाज आणि गोलंदाजसाी अनुकूल ठरल्या आहेत.
आरसीबी ही एकमेव फ्रेंचायझी नाही ज्यांनी त्यांचं होम ग्राउंड बदलण्याचा निर्णय घेतलाय. कारण राजस्थान रॉयल्सने देखील त्यांचे सामने पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळवणार आहेत. आयपीएल फ्रँचायझीचा जयपूरमधील क्रिकेटएडमिनिस्ट्रेटिव बॉडीच्या अधिकाऱ्यांशी वाद झाला होता. त्यामुळे आगामी आयपीएल सिझनपूर्वी आता दोन्ही टीम्सना नवीन होम ग्राउंड मिळणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.