आयपीएलमध्ये फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील समतोल बिघडला आहे.
सचिन तेंडुलकर यांनी इम्पॅक्ट प्लेयर’ नियम रद्द करण्याची मागणी केली.
एका गोलंदाजाला 5 षटके टाकण्याची परवानगी असावी.
आयपीएलच्या १९ सीझनचा आज अंतिम सामना अहमदबादच्या स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आरसीबी आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात भिडणार आहेत. आयपीएलच्या अंतिम सामन्याआधी क्रिकेटच्या देव सचिन तेंडुलकर यांनी आयपीएलमध्ये असमतोल असून त्यात सुधारणा केल्या पाहिजेत असं सांगितलं. आयपीएलमध्ये इम्पॅक्ट फ्लेअर नसला पाहिजे या मुद्दयावर सचिन तेंडुलकर यांनी जोर दिला. (Sachin Tendulkar Demands Big IPL Changes, Calls For Scrapping Impact Player Rule)
भारतीय क्रिकेटचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी आयपीएलमध्ये फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील समतोल राखण्यासाठी काही महत्त्वपूर्ण बदल सुचवले आहेत. 2023 पासून लागू करण्यात आलेल्या ‘इम्पॅक्ट प्लेअर’ नियमावर त्यांनी नाराजी व्यक्त करत तो रद्द करण्याची मागणी केली. मुंबईतील ईएसपीएन क्रिकइन्फो पुरस्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी 'इम्पॅक्ट प्लेयर' नियम रद्द करण्याची मागणी केली.
इम्पॅक्ट प्लेअर नियमानुसार एखादी टीम सामन्यादरम्यान अंतिम अकरातील एका खेळाडूच्या जागी आधीच जाहीर केलेल्या पाच पर्यायी खेळाडूंमधून एकाला संधी देऊ शकते. मात्र, तेंडुलकर यांच्या मते या नियमामुळे टी-20 क्रिकेटमध्ये फलंदाजांना जास्त फायदा होतो आणि गोलंदाजांवर अतिरिक्त दबाव निर्माण होतो.
एसपीएन क्रिकइन्फो पुरस्कार सोहळ्यात बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाले की, मला वैयक्तिकरित्या वाटतं की, “टी-20 क्रिकेटमध्ये फक्त 20 षटके खेळायची असतात. अशा परिस्थितीत संघाला आणखी एक फलंदाज जोडण्याची संधी दिली जात असते. त्यात आधीच गोलंदाजांसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे खेळातील समतोल बिघडलायअसं मला वाटते.”
गेल्या काही हंगामांत आयपीएलमध्ये फलंदाजांचे वर्चस्व वाढल्याचे दिसून आले आहे. शुभमन गिल, रोहित शर्मा यांसारख्या अनेक दिग्गजांनीही या नियमावर टीका केली आहे. त्यांच्या मते, या नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंचे महत्त्व कमी होत असून संघरचनेतील कौशल्यपूर्ण नियोजनावरही परिणाम होतोय.
तेंडुलकर यांनी आणखी एक महत्त्वाचा बदल सुचवला आहे. सध्या डावाच्या पहिल्या सहा षटकांमध्ये फलंदाजांसाठी पॉवरप्ले असतो. मात्र त्यांनी पहिले चार षटके फलंदाजांसाठी राखून ठेवावीत. उर्वरित दोन पॉवरप्ले षटके क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधाराला त्याच्या सोयीनुसार वापरण्याची मुभा दिली पाहिजे.
यामुळे गोलंदाजांनाही काही प्रमाणात फायदा मिळू शकतो, असं सचिन तेंडुलकर म्हणालेत. यासह प्रत्येक गोलंदाजाच्या चार षटकांच्या मर्यादेत वाढ करून ती पाच षटकांपर्यंत नेण्यात यावी अशीही शिफारस सचिन तेंडुलकर यांनी केली. “संघातील सर्वोत्तम फलंदाज अनेकदा संपूर्ण २० षटके खेळतो. मग सर्वोत्तम गोलंदाजाला ५ षटके टाकण्याची संधी का मिळू नये?” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.