IPL 2025 Playoffs saam tv
Sports

IPL 2025: ना कुठलं समीकरण, ना कुठला चमत्कार! प्लेऑफच्या शर्यतीतून 'या' 3 टीम्स पूर्णपणे बाहेर?

IPL 2025 Playoffs : चेन्नई सुपर किंग्जची यंदाच्या सिझनमध्ये काही फारशी चांगली सुरुवात झालेली नाही. सनरायझर्सविरूद्ध झालेल्या पराभवानंतर चेन्नईच्या जिंकण्याचा आशाही मावळल्या आहेत .

Surabhi Jayashree Jagdish

आयपीएल २०२५ आता मध्यावर आली आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीला काही टीम्सने जोषात सुरुवात केली होती. मात्र जसं जसं ही लीग पुढे गेली तसं प्लेऑफमध्ये जाण्याच्या काही टीम्सच्या आशा मावळल्या आहेत. अशातच आता आयपीएलमधील ३ टीम्स या स्पर्धेतून जवळपास बाहेर पडल्या आहेत. या टीम्सना आता प्लेऑफमध्ये जागा मिळणं कठीण झालं आहे.

प्लेऑफच्या रेसमधून ३ टीम्स बाहेर

आयपीएल २०२५ मध्ये आताच्या घडीला प्लेऑफची शर्यत रोमांचक झाली आहे. मात्र यावेळी ३ असा टीम्स आहेत ज्या पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात तळाला आहेत. त्यामुळे प्लेऑफ गाठणं या तिन्ही टीम्ससाठी कठीण मानलं जातंय. या टीम्समध्ये चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांचा समावेश आहे.

तिन्ही संघांचा आतापर्यंत खेळलेल्या ८ पैकी ६ सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. नेट रनरेट पाहिलं तर राजस्थान सध्या आठव्या, हैदराबाद नवव्या आणि चेन्नई दहाव्या स्थानावर आहे. ज्यांच्यासाठी प्लेऑफसाठी तिकीट मिळवणं आता जवळजवळ अशक्य दिसतंय. या तिन्ही टीम्सना अजूनही उर्वरित ६ सामने खेळायचे आहेत. जर त्यांनी यापैकी एकही सामना गमावला तर ते या स्पर्धेतून थेट बाहेर होतील.

या ४ टीम्स मजबूत स्थितीत

आयपीएल २०२५ च्या पॉइंट्स टेबलवर एक नजर टाकली तर, गुजरात टायटन्स ८ पैकी ६ सामने जिंकून १२ गुणांसह अग्रस्थानी आहे. दिल्ली कॅपिटल्सचेही गुण सारखेच असून चांगल्या नेट रन रेटमुळे गुजरात अव्वल स्थानावर आहे. तर दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आहे तर चौथ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स आहे. मुंबईने ९ पैकी ५ सामने जिंकले आहेत आणि १० गुण मिळवले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT