Retain Players By RCB: आगामी आयपीएल हंगाम जरा हटके असणार आहे. कारण ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयपीएल मेगा ऑक्शनचा थरार रंगणार आहे. त्यामुळे गेल्या हंगामात आपल्या संघाकडून खेळणारे स्टार खेळाडू आगामी हंगामात इतर संघाकडून खेळताना दिसून येतील. तर आपल्या आवडत्या संघात इतर संघातील खेळाडू खेळताना दिसतील.
आगामी ऑक्शन सुरू होण्यापूर्वी सर्व संघांना आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. दरम्यान ही यादी जाहीर करण्याची चर्चा सुरू असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या ताफ्यातून मोठी बातमी समोर येत आहे.
आयपीएल स्पर्धेच्या नियमानुसार, प्रत्येक संघाला ऑक्शन होण्यापूर्वी प्रत्येकी ४-४ खेळाडूंना रिटेन करण्याची अनुमती दिली जाते. मात्र काही दिवसांपूर्वी बीसीसीआय आणि संघमालक यांच्यात बैठक झाली. या बैठकीत ६ खेळाडू रिटेन करण्यावर चर्चा झाली. मात्र हा नियम अजूनही लागू करण्यात आलेला नाही. जर हा नियम आगामी हंगामापूर्वी लागू केला गेला, तर प्रत्येक संघाला ६-६ खेळाडू रिटेन करण्याची अनुमती असेल.
विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर ही जबाबदारी फाफ डू प्लेसिसवर सोपवण्यात आली आहे. मात्र त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. त्यामुळे आणखी काही वर्ष खेळणार की नाही? याबाबत कुठलीही स्पष्टता नाही.
त्यामुळे पुढील काही वर्षांचा विचार करता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेऊ शकतो. दुसरीकडे ग्लेन मॅक्सवेलही गेल्या हंगामात पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्याला गोलंदाजीत आणि फलंदाजीत हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे ग्लेन मॅक्सवेलचाही पत्ता कट होऊ शकतो.
गेल्या हंगामात कॅमेरून ग्रीन हा मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत होता. मात्र आयपीएल २०२४ स्पर्धपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. मात्र मोठी किंमत मोजूनही त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आगामी हंगामात त्याला रिलीज केले जाऊ शकते.
माध्यमातील वृत्तानुसार असं म्हटलं जात आहे की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ माजी कर्णधार विराट कोहली, आक्रमक फलंदाज विल जॅक्स, मोहम्मद सिराज, रजत पाटीदार, यश दयाल आणि विजय कुमार विश्याकला रिटेन करू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.