NMSA weight lifters on bipin kamble and sana mulla won gold in national weight lifting championship 2024  saam tv news
Sports

Weight Lifting News: एनएमएसएच्या वेटलिफ्टर्सनी पटकावले दोन गोल्ड मेडल्स

Weight Lifting News: नवी मुंबई स्पोट्स असोसिएशन (एनएमएसए) च्या बिपीन कांबळे आणि सना मुल्ला यांनी राष्ट्रीय वेटलिफ्टिंग चैम्पियनशिप २०२४ स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे.

Ankush Dhavre

Weight Lifting News:

नवी मुंबई स्पोट्स असोसिएशन (एनएमएसए) च्या बिपीन कांबळे आणि सना मुल्ला यांनी राष्ट्रीय वेटलिफ्टिंग चैम्पियनशिप २०२४ स्पर्धेत दमदार कामगिरी करत दोन सुवर्णपदकांची कमाई करुन एनएमएसएच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीबाबत असोसिएशनचे अध्यक्ष लोकनेते आमदार गणेश नाईक, उपाध्यक्ष डॉ. दिलीप राणे, संयुक्त सचिव दत्तू पाटील, स्पोर्ट्स चेअरमन डॉ. विजय पाटील आदी मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी यावेळी शुभेच्छा व्यक्त केल्या.

बिपीन कांबळे यांनी यापूर्वीही अनेक महत्वाच्या स्पर्धांमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. आता नवी मुंबई स्पोट्स असोसिएशनच्या या वेटलिफ्टर्सने आणखी एका मोठ्या स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. या सुवर्ण कामगिरीनंतर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. (Cricket news in marathi)

यापूर्वी त्यांनी अनेक जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. तर ४ वेळेस राष्ट्रीय स्तरावरील चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. यासह त्यांना भारताचा बलवान खिताब देखील मिळाला आहे. १ वेळेस त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. यासह २ वेळेस त्यांनी आशियाई पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT