T20 मुंबई लीगमध्ये आता नवव्या टीमची भर पडणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) नव्या फ्रँचायझीसाठी Aspect Sports या कंपनीची निवड केलीये. ही टीम नवी मुंबईचं प्रतिनिधित्व करणार आहे. Aspect Sports ला सहा वर्षांसाठी फ्रँचायझी चालवण्याचे हक्क मिळालेत. यासाठी कंपनीने 106.88 कोटी रुपयांची बोली लावलीये. पहिल्या सिझनसाठी 12.21 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.
नवी मुंबईच्या टीमचा समावेश झाल्यामुळे या भागातील आणखी खेळाडूंना T20 मुंबई लीगमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. नव्या आणि युवा खेळाडूंना त्याचं कौशल्य दाखवण्यासाठीही मोठी संधी मिळणार आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सांगितलं की, T20 मुंबई लीग नवी मुंबईपर्यंत पोहोचणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. नवव्या टीममुळे लीगचा विस्तार होणार आहे. त्याचप्रमाणे नव्या खेळाडूंना चांगल्या स्पर्धेत त्यांचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. Aspect Sportsचे लीगमध्ये स्वागत असून MCA आणि कंपनी मिळून लीग आणखी मजबूत करण्यासाठी आणि नव्या क्रिकेटपटूंना घडवण्यासाठी काम करतील.
T20 मुंबई लीग गव्हर्निंग काऊंसिलचे अध्यक्ष राजदीप गुप्ता यांनीही नव्या टीमचं स्वागत केलं. नवव्या टीममुळे लीग आणखी मोठी होण्यास मदत होणार आहे. यामुळे खेळाडूंना पुढे जाण्यासाठी अधिक संधी मिळतील. तसंच लीगशी जोडलेल्या भागीदारांसाठी अधिक संधी निर्माण होतील आणि परिसरातील प्रेक्षकांशी लीगचे नातं आणखी मजबूत होणार आहे.
लीगचा 'फेस ऑफ द लीग' हा वर्ल्डकप विजेता भारतीय कर्णधार रोहित शर्मा आहे. T20 मुंबई लीगच्या 2026 च्या यशस्वी सिझनमध्ये सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर, सरफराज खान आणि तुषार देशपांडे यांसारख्या स्टार खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
नवव्या संघाच्या समावेशामुळे T20 मुंबई लीगचा विस्तार आणखी होणार असून मुंबई आणि आसपासच्या भागातील नव्या क्रिकेटपटूंना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.
Aspect Global Ventures या कंपनीची Aspect Sports ही मालकीची कंपनी आहे. कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षा अक्षा कांबोज यांनी सांगितलं की, T20 मुंबई लीगशी जोडल्याचा आनंद आहे. Aspect Sportsच्या माध्यमातून खेळाडूंसाठी संधी निर्माण करणं, लोकांना खेळाशी जोडणं आणि भारतातील क्रीडा क्षेत्राच्या विकासात योगदान देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.