Neeraj Chopra Saam TV
क्रीडा

Neeraj Chopra : नीरज चोप्राची पुन्हा फायनलमध्ये धडक; पहिल्याच प्रयत्नात मैदान मारलं

नीरज चोप्राने आतापर्यंत यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केली आहे.

Satish Daud

नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील मेडलिस्ट नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतही आनंदाची बातमी दिली. शुक्रवारी नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. आपल्या पहिल्याच प्रयत्नात नीरजने ८८.३९ मीटर लांब भाला फेकला. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची नीरजची पहिलीच वेळ आहे. (Neeraj Chopra Latest News)

नीरज पाठोपाठ झेक प्रजासत्ताकच्या जाकुब व्हॅद्लेचने ८५.२३ मीटरसह फायलनमधील स्थान पक्के केले. ८३.५० मीटर हे थेट फायनल प्रवेशासाठीचे लक्ष्य होते. नीरज प्रथमच या स्पर्धेत पदकाच्या शर्यतीत खेळणार आहे. अंतिम स्पर्धा रविवारी सकाळी ७.०५ वाजता होणार आहे.

गेल्या वर्षी टोक्यो ऑलिंपिक स्पर्धेत नीरजने देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या या स्टार खेळाडूने आता जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या पात्रता फेरीत देखील कमाल करून दाखवली. पुरुषांच्या भालाफेकमध्ये एकूण ३४ खेळाडू होते. या खेळाडूंना दोन गटात विभागण्यात आले होते. दोन्ही गटातून सर्वोत्तम १२ जणांची अंतिम फेरीसाठी निवड केली गेली. आता २४ जुलै, रविवारी अंतिम फेरी होणार आहे. (Neeraj Chopra News)

रविवारी नीरज चोप्रा जिंकला तर २००८-०९ मध्ये नॉर्वेच्या एंड्रियांसने केलेल्या कामिगिरीची बरोबरी तो करेल. ऑलिम्पिक आणि वर्ल्ड चॅम्पियशिप जिंकणारा तो दुसरा पुरुष भाला फेकपटू बनू शकतो. तसंच १९ वर्षांपासून वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील पदकांचा दुष्काळ संपेल. भारताला शेवटचं पदक वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये २००३ मध्ये अंजू बॉबी जॉर्जने मिळवून दिलं होतं. तिने लांब उडीत कांस्य पदकाची कमाई केली होती.

नीरज चोप्राने आतापर्यंत यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. १४ जून रोजी फिनलँड येथे झालेल्या पावो नुर्मी स्पर्धेत त्याने ८९.३० त्यानंतर ३० जून रोजी स्टॉकहोम येथील डायमंड लीग स्पर्धेत ८९.९४ मीटर थ्रो केला होता. अर्थात इतकी चांगली कामगिरी करून त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तेवहा एडरसन पीटर्सने ९०.३१ सह सुवर्णपदक जिंकले होते.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

SCROLL FOR NEXT