niraj chopra / Social media ऑलिम्पिक पदकविजेता नीरज चोप्रा एशियन गेम्सबाहेर
Sports

Niraj Chopra : भारतीय चमूला मोठा झटका; 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा एशियन गेम्सबाहेर

Neeraj Chopra ruled out of Asian Games 2026 due to injury : एशियन गेम्सआधीच भारतीय चमूला धक्का देणारं वृत्त येऊन धडकलंय. दोन वेळा ऑलिम्पिक विजेता अॅथलिट नीरज चोप्रा हा यावर्षीच्या उर्वरित सीझनमध्ये खेळणार नाही. तसंच पुढील महिन्यात होणाऱ्या एशियन गेम्समध्येही तो भाग घेणार नाही.

Nandkumar Joshi

भारताचा 'सुपरस्टार' भालाफेकपटू नीरज चोप्रा दुखापतीमुळं यावर्षीच्या उर्वरित स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकत नाही. यापुढील काळात होणाऱ्या उर्वरित सर्व स्पर्धांमधून त्यानं माघार घेतली आहे. तसेच पुढील महिन्यात होणाऱ्या डायमंड लीग फायनल्स आणि एशियन गेम्समध्येही तो सहभागी होऊ शकणार नाही. एशियन गेम्समध्ये त्याच्याकडून पदकाची अपेक्षा केली जात होती. पण आता दुखापतीमुळं तो बाहेर झाल्यानं भारतीय चमू आणि क्रीडा चाहत्यांना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

नीरज चोप्रा यानं यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. दुखापतीमुळं मला आणि माझ्या टीमला या सीझनमधील उर्वरित स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार नाही. दुर्दैवाने ट्रेनिंगवेळी पायाला दुखापत झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर या मोसमातील उर्वरित स्पर्धांमध्ये सहभागी सहभागी न होण्याचा निर्णय घेतला, असं नीरज म्हणाला.

नीरजने चांगल्या कामगिरीच्या जोरावर डायमंड लीगच्या फायनलमध्ये स्थान निश्चित केलं होतं. झुरिचमध्ये झालेल्या सामन्यात खेळला नाही तरी तो फायनलच्या शर्यतीत पुढे होता. फायनलमध्ये एन्ट्री केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्याने उर्वरित सर्व स्पर्धांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

डायमंड लीगमध्ये १२ गुण

यावर्षी नीरजने डायमंड लीगमध्ये खेळताना १२ गुणांची कमाई केली होती. स्वीत्झर्लंडच्या लुसानेमध्ये झालेल्या सामन्यात त्याने या मोसमातील विक्रमी ८८.०५ मीटर लांबीचा थ्रो फेकला होता. अवघ्या ९ सेंटिमीटर अंतराच्या फरकाने त्याने पहिलं स्थान गमावलं होतं. त्याआधी दोहा डायमंड लीग, तर कॉमनवेल्थ गेम्समध्ये तो सहभागी झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Maharashtra News Live Update: निगडीतील मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

देशभरातून खासदार-आमदार दिल्लीत दाखल; ३ प्रमुख मागण्यांसाठी थेट सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा, राहुल गांधींची आक्रमक प्रतिक्रिया

Monsoon Update : मुसळधार पाऊस झोडपणार! २४ राज्यांना अलर्ट जारी; महाराष्ट्रात कसं असेल हवामान? वाचा

भीमनवार सक्तीच्या रजेवर, मुंढेंच्या हाती सूत्रे! पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित, मध्यरात्री मोठ्या घडामोडी

SCROLL FOR NEXT