neeraj chopra mother twitter
Sports

Neeraj Chopra Mother Statement: 'नीरज जिंकल्याचा मला आनंद, अर्शदही माझ्या मुलासारखाच..' नीरजच्या आईंची पहिली प्रतिक्रिया

Neeraj Chopra Mother Statement After He Won Silver: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राला यावेळी रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. दरम्यान हे पदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राच्या आईंनी मन जिंकणारी प्रतिक्रिया दिली आहे.

Ankush Dhavre

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास रचला आहे. सुवर्ण पदकाची संधी हुकली तरी देखील त्याने रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं आहे. यासह तो ऑलिम्पिक स्पर्धेतील ट्रॅक अँड फील्ड प्रकारात सलग पदकं जिंकणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे. या विजयानंतर नीरज चोप्राने आईंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. (Neeraj Chopra)

काय म्हणाल्या नीरज चोप्राच्या आई?

नीरज चोप्राचा भालाफेक प्रकारातील फायनलचा सामना पाहण्यासाठी त्याच्या राहत्या गावी विशेष सोय करण्यात आली होती. संपूर्ण गावाने त्याची फायनल मोठ्या स्क्रीनवर पाहिली आणि त्याच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. दरम्यान त्याच्या आईंनीही रौप्य पदक जिंकल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतासाठी पाहिलं रौप्य पदक जिंकलं आहे. याबाबत बोलताना त्याच्या आई (Neeraj Chopra Mother) म्हणाल्या की, ' नीरजला रौप्य पदक मिळाल्याचा मला आनंद आहे. ज्या मुलाने सुवर्ण पदक पटकावलं ( अर्शद नदीम) तो ही माझ्या मुलासारखाच आहे. प्रचंड मेहनत घेतल्यानंतर ते त्या स्तरावर पोहोचले.' नीरज चोप्राच्या आईंनी सुवर्ण पदक विजेत्या अर्शद नदीमचेही (Arshad Nadeem) कौतुक केले आहे.

अर्शदला सुवर्ण नीरजला रौप्य पदक

या फायनलमध्ये अर्शद नदीमने ९२.९७ मीटर लांब थ्रो करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. हा ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात लांब थ्रो ठरला आहे. या थ्रो च्या बळावर त्याने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील सुवर्ण पदक पक्कं केलं. तर नीरज चोप्राला इतक्या लांब थ्रो करता आला नाही. गोल्डन बॉय नीरजने ८९.५४ मीटर थ्रो केला. हा त्याचा आतापर्यंतचा सर्वोत्तम थ्रो ठरला आहे. दरम्यान यासह त्याने रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT