भारताचा स्टार भालाफेकपटू निरज चोप्राने (Neeraj Chopra) भारतासाठी पहिलं वहिलं सुवर्ण (First Gold Medal At Tokyo) पदक जिंकले आहे. त्याने पहिल्या प्रयत्नात 87.03 मीटर भाला फेकत विक्रम केला आहे. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 87.58 मीटर भाला फेकला आणि तिथेच त्याने सुवर्णपदकाला गवसनी घातली. चौथ्या प्रयत्नात निरज चोप्राचा फाऊल झाला. टोकियो ऑलिम्पिक 2020 (Tokyo Olympics) मध्ये भारताकडून सुवर्ण पदक जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. या अगोदर बिजींग ऑलिम्पिकमध्ये 2008 मध्ये अभिनव बिंद्राने (Abhinav Bindra) सुवर्ण पदक जिंकले होते. निरजने सुवर्ण पदक जिंकून भारताचे आणि कुंटुंबाचे नाव रोशन केले आहे.
दरम्यान भारत आणि पाकिस्तान कोणत्याही खेळात एकमेकांच्या समोर आले तर त्याचा वेगळाच थरार असतो. क्रीडाप्रेमी या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात. पुन्हा एकदा हा क्षण परत आला होता. टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भारत आणि पाकिस्तान आमनेसामने होते. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पाकिस्तानच्या अर्शद नदीमशी (Arshad Nadeem) आणि अन्य 10 खेळाडूंशी दोन हात केले.
ऑलिम्पिकमध्ये प्रथमच सहभागी होणाऱ्या नीरज चोप्राने आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत. 4 ऑगस्ट रोजी नीरजने पहिल्याच प्रयत्नात 86.65 मीटर भाला फेकत अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. गट 'ब' मध्ये पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने 85.16 च्या भालाफेकसह अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या पाकिस्तानी खेळाडूने नीरज चोप्रापासून प्रेरणा घेऊनच भालाफेकमध्ये पाऊल ठेवले, आणि आज दोघेही अंतिम सामन्यात एकमेकांना सामोरे खेळताना दिसत होते. हे दोन खेळाडू एकमेकांसमोर येण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी अर्शद नदीमने आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. यादरम्यान भारताच्या नीरज चोप्राने सुवर्णपदक पटकावले होते. या दोघांचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.