Tokyo Olympics: बजरंगची कमाल! जखमी असतानाही जिंकले 'कांस्य'

भारताच्या खात्यात पुन्हा एका पदकाची भर पडली आहे. स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने (Wrestler Bajrang Punia) भारतासाठी कांस्यपदक जिकले आहे.
Tokyo Olympics
Tokyo OlympicsTwitter
Published On

भारताच्या खात्यात पुन्हा एका पदकाची भर पडली आहे. स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने (Wrestler Bajrang Punia) भारतासाठी कांस्यपदक जिकले आहे. स्पर्धेतील हे एकून 4 कांस्य पदक आहे. त्याने कझाकिस्तानच्या दौलेट नियाझबेकोव्हचा 8-0 असा पराभव केला आहे. दरम्यान बजरंग पुनियाबाबत एक मोठी बातमी समोर आली होती.

गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो शुक्रवारी आक्रमक कुस्ती लढत खेळू शकला नव्हता. ज्यासाठी तो ओळखला जातो. दुखापत असूनही पुनिया कांस्यपदकाच्या लढतीत खेळेला. त्याचे वडील बलवान सिंह म्हणाले की आम्ही सकाळी फोनवर बोललो आणि म्हणालो- मी त्याला आज त्याचे सर्वोत्तम देण्यास सांगितले आहे.

Tokyo Olympics
BANvsAUS: बांगलादेशच्या धुरंधरांनी केला ऑस्ट्रेलियाचा सुपडा साप; रचला 'इतिहास'!

याआधी भारताच्या बजरंग पुनियाला ६५ किलो कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अझरबैजानच्या हाजी अलिवकडून ५-१२ ने पराभूत व्हावे लागले. 'लेग-डिफेन्स'च्या कमकुवतपणामुळे बजरंग पुन्हा एकदा मोठ्या पातळीवर अडचणीत आला होता. रिओ ऑलिम्पिक कांस्य विजेता अझरबैजानचा अलिवने बजरंगच्या पायांवर वारंवार हल्ला केला आणि दोनदा स्वतःला अशा स्थितीत ढकलले जेथे तो सहज दोन गुण मिळवण्यात यशस्वी झाला.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com