BANvsAUS: बांगलादेशच्या धुरंधरांनी केला ऑस्ट्रेलियाचा सुपडा साप; रचला 'इतिहास'!

ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशविरूद्ध (BAN vs AUS) खेळल्या जाणाऱ्या टी -20 मालिकेच्या (T-20 Series) तिसऱ्या सामन्यात बांगालादेशने इतिहास रचला आहे.
BANvsAUS
BANvsAUSTwitter/ @ICC
Published On

ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशविरूद्ध (BAN vs AUS) खेळल्या जाणाऱ्या टी -20 मालिकेच्या (T-20 Series) तिसऱ्या सामन्यात बांगालादेशने इतिहास रचला आहे. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा 10 धावांनी पराभव करत सामन्यासह मालिका आपल्या खिशात टाकली आहे. क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच बांगलादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका जिंकली आहे. जरी हा सामना शेवटपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या हातात होता, पण मुस्तफिजुर रहमानच्या 19 व्या षटकात बांगलादेशने हातातून गेलेल्या सामन्यावर आपली पकड मिळवली.

BANvsAUS
IND vs ENG : ऑल राउंडर जडेजाची खास विक्रमाला गवसणी!

बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी -20 मध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 128 धावांचे लक्ष्य मिळाले होते. ऑस्ट्रेलिया 17 व्या षटकापर्यंत विजयाच्या उंबरठ्यावर होता. संघाला विजयासाठी 18 चेंडूत 34 धावांची गरज होती. पण 51 धावांवर खेळणाऱ्या मिशेल मार्शची विकेट ऑस्ट्रेलियासाठी सामना फिरवणारी ठरली, जरी त्यानंतर 18 व्या षटकात 11 धावा गेल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 12 चेंडूत 23 धावांची गरज होती. पण मुस्तफिझूर रहमानचे 19 वे षटक ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचे कारण ठरले. या षटकात फक्त 1 धाव झाली. या ऐतिहासिक सामन्यात मुस्तफिझूर रहमानला बळी घेण्यात यश आले नाही, पण त्याने 24 चेंडूत फक्त 9 धावा दिल्या.

दरम्यान बांगलादेशने 20 षटकांत 127 धावा केल्या होत्या. कर्णधार महमुदुल्लाह रियाधने सर्वाधिक 52 धावा केल्या होत्या. त्यासाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता. शुक्रवारच्या टी-20 सामन्यात विजय नोंदवून बांगलादेशने मालिकेत 3-0 असा विजय मिळवला. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विपक्षीय मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी 5 आणि 6 ऑगस्ट रोजी खेळलेले दोन्ही टी -20 सामने बांगलादेशने जिंकले होते. आता मालिकेतील चौथा टी -20 सामना शनिवारी खेळला जाणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com