neeraj chopra twitter
Sports

Neeraj Chopra Throw: गोल्डन बॉय चमकला! नीरज चोप्राचा 89.34 मीटर भाला फेकत फायनलमध्ये प्रवेश; पाहा तो क्षण- VIDEO

Paris Olympics 2024, Neeraj Chopra Qaulifies for Final: भारताचा स्टार नीरज चोप्राने 89.34 मीटर भाला फेकत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ (Paris Olympics 2024) स्पर्धेतील ११ व्या दिवशी भारतीय फॅन्ससाठी गुड न्यूज समोर आली आहे. भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने पात्रता फेरीत ८९.३४ मीटर भाला फेकत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. (Neeraj chopra)

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील दहाव्या दिवशी मराठमोळ्या अविनाश साबळेने गुड न्यूज दिली. त्याने ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दहाव्या दिवसाचा शेवट गोड झाल्यानंतर ११ व्या दिवशीही भारतीय खेळाडूंनी शुभ सुरुवात केली आहे. कोट्यावधी भारतीय ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. तो क्षण आला. भारताचा गोल्डन बॉय नीरज अॅक्शनमध्ये दिसणार होता.(Neeraj Chopra Throw)

भालाफेक प्रकारातील पात्रता फेरीत जिथे इतर खेळाडू ७०- ७५ मीटरच्या पुढे जात नव्हते. तिथे नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८९.३४ मीटर भाला फेकला आणि भारताचं एक पदक जवळजवळ निश्चित झालं आहे. मंगळवारी भालाफेक प्रकारातील पात्रता फेरीतील सामने खेळले गेले. नीरज चोप्राचा बी ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला होता. ज्यात नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८९.३४ मीटर भाला फेकत फायनलमध्ये प्रवेश केला. इतर कुठल्याच खेळाडूला ८९ मीटर इतका भाला फेकता आला नाही. जर्मनीच्या ज्युलियन वेबरने ८७.७६ मीटर इतका भाला फेकला.

भारताकडून नीरज चोप्रासह किशोर जेना देखील पात्रता फेरीसाठी मैदानात उतरला होता. त्याचा ए ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला होता. त्याने ८०.७३ मीटर भाला फेकला. त्यामुळे तो पुढच्या फेरीत जाऊ शकलेला नाही. त्याचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

SCROLL FOR NEXT