Neeraj Chopra Latest Marathi News today Saam TV
क्रीडा

Neeraj Chopra News: नीरज चोप्राने 'जग' जिंकलं! वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिलाच भारतीय

Neeraj Chopra Latest News: भारताचा गोल्डनबॉय म्हणून ओळखला जाणारा भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली.

Satish Daud

Neeraj Chopra Latest News: भारताचा गोल्डनबॉय म्हणून ओळखला जाणारा भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली. वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरजने सुवर्णपदकाला गवसणी घातली. यासह वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा तो पहिलाच भारतीय ठरला. नीरज चोप्राने 88.17 मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदकावर नाव कोरलं.  (Latest Marathi News)

गेल्या वर्षीची वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा अमेरिकेत पार पडली होती. या स्पर्धेत नीरजने रौप्य पदक पटकावलं होतं. मात्र, यावर्षीच्या स्पर्धेत नीरज चोप्राने (Neeraj Chopra) संधीचं सोनं केलं. हंगेरीतील बुडापेस्टमध्ये रंगलेल्या या स्पर्धेत त्याने सुवर्ण कामगिरी करत १४० कोटी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली.

भारतासाठी वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ट्रॅक अँड फिल्ड कॅटेगरीत मिळालेलं हे पहिलं सुवर्णपदक आहे. त्याच्याआधी अंजू बॉबी जॉर्ज हिने 2003 मध्ये लांब उडी प्रकारात कांस्य पदक जिंकलं होतं. तर नीरज चोप्राने 2022 मध्ये रौप्य पदक पटकावलं होतं.

नीरजने कसं जिंकलं सुवर्णपदक?

फायनलमध्ये नीरज चोप्राचा पहिला प्रयत्न फाउल ठरला. पण दुसऱ्या थ्रोमध्ये त्याने ८८.१७ मीटर अंतर गाठले. दुसऱ्या स्थानी पाकिस्तानचा अरशन नदीम राहिला. त्याने तिसऱ्या प्रयत्नात बेस्ट थ्रो केला. भालाफेकीत नीरज चोप्राशिवाय भारताचे डीपी मनु आणि किशोर जेना हेसुद्धा फायनलमध्ये होते. मात्र किशोर पाचव्या तर मनु सहाव्या क्रमांकावर राहिले.

विशेष बाब म्हणजे नीरज चोप्राने वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकण्याआधीच पॅरिस ऑलिम्पिकचं आपलं तिकीट पक्कं केलं. त्याने पहिल्याच फेरीत ऑलिम्पिक पात्रता पूर्ण केली. पॅरिस ऑलिम्पिक २६ जुलै २०२४ ते ११ ऑगस्ट २०२३ या कालावधीत होणार आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : कसब्यात मनसेच्या कार्यकर्त्यांना धमक्या

Maharashtra Election : शिंदेंना टोकलं, ठाकरेंना पटलं; एकनाथ शिंदेंना 'गद्दार' म्हणत तरुणाची घोषणाबाजी VIDEO

Maharashtra Politics : मुंबईत राडा! ठाकरे-शिंदेंचे समर्थक आमनेसामने, दगडफेक अन् मारामारीमुळे वातावरण तापलं!

Assembly Election: सरकारची दोरी, शेतकऱ्यांच्या हाती; कांद्यापाठोपाठ सोयाबीन महायुतीला रडवणार?

Assembly Election: भाजपनं सोडली अमित ठाकरेंची साथ? सरवणकरांच्या रॅलीत कमळाचे झेंडे

SCROLL FOR NEXT