Neeraj Chopra Ranking in Lausanne Diamond League: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत शानदार कामगिरी केली होती. या स्पर्धेतील फायनलमध्ये त्याने ८९.४७ मीटर लांब भाला फेकत रौप्यपदक पटकावलं होतं.
तर ९२.९७ मीटर लांब भाला फेकून अर्शद नदीमने सुवर्ण पदकावर निशाणा साधला. दरम्यान नीरज चोप्रा डायमंड लीगमध्ये खेळण्यासाठी उतरला होता. या स्पर्धेत त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे.
या स्पर्धेत ग्रेनाडाच्या अँडरसनने शानदार कामगिरी करून दाखवली आहे. त्याने ९०.६१ मीटर लांब भाला फेकत अव्वल स्थानी कब्जा केला. या स्पर्धेतील सुरुवातीच्या चार फेरीत नीरज चोप्रा पिछाडीवर होता.
मात्र त्यानंतर पाचव्या फेरीत नीरजने कमबॅक केलं आणि टॉप ३ मध्ये प्रवेश केला. या स्पर्धेत ८९.४९ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. या थ्रो सह त्याने दुसरं स्थान गाठलं. तर दुसरीकडे अँडरसन पीटर्सने या स्पर्धेतील सर्वोत्तम थ्रो केला.
त्याने ९०.६१ मीटर लांब थ्रो करत अव्वल स्थानी झेप घेतली. या शानदार कामगिरीसह नीरज चोप्राने पुढच्या महिन्यात होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
नीरज चोप्राला या स्पर्धेतही हवी तशी सुरुवात करता आली नाही. त्याने ८२.१० मीटर लांब थ्रो करत सुरुवात केली खरी मात्र त्यानंतर त्याला हवा तसा थ्रो करता आला नाही. शेवटी ८९.४९ मीटर लांब थ्रो करत त्याने आपलाच रेकॉर्ड मोडून काढला.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने ८९.४५ मीटर लांब थ्रो केला होता. नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानी राहिला. तर जर्मनीचा ज्युलियन वेबर ८७.०८ मीटर थ्रो सह तिसऱ्या स्थानी राहिला.
नीरजने या स्पर्धेतील पहिल्या फेरीत चांगला थ्रो केला. मात्र पुढील फेरीत त्याला हवा तसा थ्रो करता आला नाही. सुरुवातीला ८२.१० मीटर हा त्याचा सर्वोत्तम थ्रो ठरला. त्यानंतर ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने पहिलाच थ्रो ८६.३६ मीटरचा केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.