hardik pandya with neeraj chopra saam tv
Sports

Neeraj Chopra: नीरज चोप्राची ब्रँड व्हॅल्यू ३३० कोटींच्या घरात! हार्दिक पंड्यालाही सोडणार मागे

Neeraj Chopra Brand Value: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतही पदकावर निशाणा साधला. दरम्यान या शानदार कामगिरीनंतर त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ (Paris Olympics 2024) स्पर्धेत नीरज चोप्रा (Neeraj Chopra) भारताकडून पुन्हा एकदा चमकला. नीरज चोप्राला सुवर्ण पदकासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. मात्र अर्शद नदीमच्या रेकॉर्ड ब्रेकिंग थ्रोमुळे नीरजला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे.

दरम्यान ऑलिम्पिकमध्ये २ पदकं जिंकणाऱ्या नीरज चोप्राची ब्रँड व्हॅल्यू (Neeraj Chopra Brand Value) आता गगनाला जाऊन भिडली आहे. लवकरच ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत तो हार्दिक पंड्यालाही मागे सोडलं आहे.

नीरजने टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेत सुवर्ण पदक आणि पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदकाला गवसणी घातली. फायनेंशियल ॲडवायझरी क्रोलाने दिलेल्या माहितीनुसार, नीरज चोप्राची ब्रँड व्हॅल्यू ही ३३० कोटींच्या पुढे जाणार आहे.

भारतात सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत क्रिकेटपटू अव्वल स्थानी आहेत. तर नीरज चोप्रा हा नॉन क्रिकेटर म्हणून सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेला भारतीय खेळाडू आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये झपाट्याने वाढ झाली.

मनू भाकरच्या ब्रँड व्हॅल्यूतही वाढ

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्रासह मनू भाकरचीही (Manu Bhaker) जोरदार चर्चा झाली. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मनू भाकरने पदकांचं खातं उघडून दिलं होतं. तिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य पदकाला गवसणी घातली. (Manu Bhaker Brand Value)

त्यानंतर १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात तिने सरबजोत सिंगसोबत मिळून कांस्यपदकाला गवसणी घातली. डबल ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर मनू भाकरची ब्रँड व्हॅल्यूही वाढली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, ऑलिम्पिक स्पर्धेत जाण्यापूर्वी तिची ब्रँड व्हॅल्यू २५ लाख रुपये इतकी होती. जी आता १ कोटींच्या पुढे गेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local body Election : झेडपी, नगर पंचायतीच्या निवडणुका लांबणार? आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार

Maharashtra Live News Update: येत्या ५ तारखेला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता

UPSC Success Story: ८ वेळा अपयश, नवव्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; स्वच्छता कर्मचाऱ्याचा लेक झाला सरकारी अधिकारी

Local Body Election : ताई की दादा, लाडकी बहीण कोणाची? लाडकीवरुन महायुतीतच लढाई

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT