Neeraj Chopra  Saam tv
Sports

Neeraj Chopra : भारताचा गोल्डन बॉय लग्नबंधनात अडकला; खेळाडू नीरज चोप्राची बायको आहे तरी कोण?

Neeraj Chopra Marriage Photos : भारताचा गोल्डन बॉयने लग्न केलं आहे. त्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत त्याची माहिती दिली. त्यानंतर नीरजवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Vishal Gangurde

भारतचा स्टार खेळाडू आणि गोल्डन बॉय नीरज चोप्रा हा लग्न बंधनात अडकला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. नीरजने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तीन फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये त्याची बायको देखील आहे. तीन फोटो शेअर करत त्याने सुंदर कॅप्शन देखील दिलं आहे.

नीरजने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं की, 'माझ्या कुटुंबासह जीवनाचा नवीन अध्याय सुरु केलाय'. नीरजने पुढे म्हटलं की, ' या क्षणाला एकत्र आणणाऱ्या तुमच्या प्रत्येक आशीवार्दासाठी आभारी आहे'. नीरजच्या पत्नीचं नाव हिमानी आहे. नीरजने लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. काही क्षणात नीरजचे फोटो व्हायरल झाले आहेत. नीरज आणि हिमानी हनीमूनसाठी अमेरिकेला गेले आहेत.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या नीरज अमेरिकेचं वृत्तपत्र 'ट्रॅक अँड फिल्ड न्यूज'ने भालाफेकीमधील जगातील सर्वश्रेष्ठ पुरुष अॅथलीट उपमा दिली होती. २०२४ साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील पाकिस्तानचा अरशद नदीमनंतर दुसऱ्या स्थानावर राहणारा नीरज चोप्राला कॅलिफोर्नियातील वृत्तपत्राने २०२४ सालच्या रँकिंगमध्ये टॉप स्थान मिळवलं होतं.

पॅरिसमध्ये जिंकलं होतं रौप्य पदक

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने चांगली कामगिरी करत ८९.४५ मीटर दूर भाला फेकला होता. तरी नीरज दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. त्याला रौप्यपदक मिळालं होतं. तर पाकिस्तानचे अरशद नदीमने ९२.९७ मीटर दूर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: किल्ल्यावर तरुणांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली एक जखमी, टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

SCROLL FOR NEXT