Neeraj Chopra
Neeraj Chopra  Saam Tv
क्रीडा | IPL

Neeraj Chopra: नीरज चोप्रानं रचला इतिहास; डायमंड लीग ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय

वृत्तसंस्था

Neeraj Chopra: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. पुन्हा एकदा नीरजने भारतीयांची मान गर्वाने उंच केली आहे. नीरजने डायमंड लीगच्या अंतिम फेरीत विजेतेपद पटकावले आहे. ही कमाल कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.

नीरजने 88.44 मीटर अंतरावर भाला फेकला आणि पदकावर आपलं नाव कोरलं. त्याच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अंतिम फेरीत नीरजने झेक प्रजासत्ताकचा याकुब वाडलेज आणि जर्मनीचा ज्युलियन वेबर यांचा पराभव केला.

पहिला थ्रो ठरला फाऊल

या डायमंड लीगच्या फायनलमध्ये नीरजची सुरुवात चांगली झाली नाही कारण त्याचा पहिला थ्रो फाऊल होता. मात्र, त्याने दुसऱ्या प्रयत्नात 88.44 मीटर अंतरावर भाला फेकला तिसऱ्या प्रयत्नात 88.00 मीटर, चौथ्या प्रयत्नात 86.11 मीटर तर पाचव्या प्रयत्नात 87.00 मीटर आणि सहाव्या प्रयत्नात 83.60 मीटर भाला फेकला आणि आणि पदकावर आपलं नाव कोरलं.

रौप्य पदक पटकावताना झाली होती दुखापत

दरम्यान, नीरज चोप्रा लुसाने मध्ये डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला होता. नीरजने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये ८८.१३ मीटर भाला फेकत ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले होते. त्या सामन्यादरम्यान नीरजच्या मांडीला दुखापत झाली होती. यानंतर नीरज चोप्राला वैद्यकीय पथकाने चार-पाच आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तो बर्मिंगहम येथे 28 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत तो खेळू शकला नाही

नीरजला 2021 मध्ये ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण, 2018 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, 2018 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण, 2022 मध्ये जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकून भारताचा गौरव वाढवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचं 'पानीपत'; IPLमधील कोलकाताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा बहजत 'या' कारला आहे मागणी

Maharashtra Election: नाशकातून शिंदे गटाने तिकीट दिल्याचा दावा; कोण आहेत शांतीगिरी महाराज?

Toyota Rumion कार भारतात लॉन्च, मोठ्या फॅमिलीसाठी आहे बेस्ट; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

SCROLL FOR NEXT