shreyas iyer twitter
Sports

Shreyas Iyer: रणजी ट्रॉफी खेळायची नव्हती म्हणून पाठदुखीचं नाटक केलं? NCA चा श्रेयस अय्यरबाबत धक्कादायक खुलासा

Shreyas Iyer Injury Update: मध्यक्रमात सुपरफ्लॉप ठरलेल्या श्रेयस अय्यरला देखील भारतीय संघातून बाहेर केल्यानंतर रणजी ट्रॉफी खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र तो दुखापतीमुळे रणजी ट्रॉफीपासून दूर राहिला

Ankush Dhavre

NCA On Shreyas Iyer:

भारतीय संघातील खेळाडू संघाबाहेर असताना रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळण्यास नकार देताना दिसून येत आहेत. बीसीसीआयने अशा खेळाडूंना वॉर्निंग दिली होती. मात्र तरीही हे खेळाडू आपल्या संघासोबत जोडले गेलेले नाहीत.

मध्यक्रमात सुपरफ्लॉप ठरलेल्या श्रेयस अय्यरला देखील भारतीय संघातून बाहेर केल्यानंतर रणजी ट्रॉफी खेळण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र तो दुखापतीमुळे रणजी ट्रॉफीपासून दूर राहिला. आता त्याच्या दुखापतीबाबत NCA ने मोठा खुलासा केला आहे. (Cricket news marathi)

माध्यमातील वृत्तानुसार, NCA ने बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केलं आहे की, श्रेयस अय्यर पूर्णपणे फिट आहे. ही माहिती बाहेर येताच क्रिकेट चाहत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. काहींचं म्हणणं आहे की, रणजी ट्रॉफी खेळायची नव्हती म्हणून श्रेयस अय्यरने दुखापतग्रस्त असल्याचं नाटक केलं.

श्रेयस अय्यर पूर्णपणे फिट..

नॅशनल क्रिकेट अकॅडमीचे क्रीडा विज्ञान आणि औषध विभागाचे प्रमुख नितिन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त नसुन तो पूर्णपणे फिट आहे. तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार,श्रेयस अय्यरला बडोदाविरुद्ध होणारा रणजी ट्रॉफीतील क्वार्टर फायनलचा सामना खेळायचा नव्हता. त्यामुळे त्याने पाठीच्या दुखण्याचं नाटक केलं. अय्यरला काहीच दुखापत नाही. तो शुक्रवारी बडोदाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळताना दिसेल.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गेल्या आठवड्यात सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये असलेल्या खेळाडूंना वॉर्निंग दिली होती. त्यांनी स्पष्ट केलं होतं की,सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये असून संघाबाहेर असणाऱ्या खेळाडूंना रणजी ट्रॉफी खेळणं बंधनकारक असणार आहे. अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील. श्रेयस अय्यरसह इशान किशनला देखील जय शाह यांनी वॉर्निंग दिली होती.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना इशान किशनने मानसिक थकवा जाणवत असल्याचा हवाला देत संघाबाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्याला देखील आपल्या संघाकडून रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मात्र त्याने रणजी ट्रॉफी स्पर्धेला पाठ फिरवत आयपीएल स्पर्धेसाठी सराव करायला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

SCROLL FOR NEXT