Reva Parab Saam Tv
Sports

Reva Parab: देशातील सर्वात मोठ्या स्विमेथॉनमध्ये नवी मुंबईची १२ वर्षीय रेवा परब ठरली अव्वल

Florid kochi swimathon ultra 2024: केरळच्या पेरियार नदीतील तिसऱ्या फ्लोरिड कोची स्विमेथॉनमध्ये नवी मुंबईच्या 12 वर्षीय रेवा परबनं पहिला क्रमांक पटकावला आहे. फ्लोरिड कोची ही देशातील सर्वात मोठी स्विमेथॉन आहे. ओपन कॅटेगरीत पुरुष आणि महिला गटात रेवा अव्वल ठरली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

केरळच्या पेरियार नदीतील तिसऱ्या फ्लोरिड कोची स्विमेथॉनमध्ये नवी मुंबईच्या 12 वर्षीय रेवा परबनं पहिला क्रमांक पटकावला आहे. फ्लोरिड कोची ही देशातील सर्वात मोठी स्विमेथॉन आहे. ओपन कॅटेगरीत पुरुष आणि महिला गटात रेवा अव्वल ठरली आहे. स्पर्धेचं अंतर 2 तास 41 मिनिटात पोहून पार करत रेवा स्पर्धेतील फास्टेस्ट स्विमर ठरलीय.

रेवा निखिल परब असे या मुलीचे नाव आहे. ती एक स्विमर आहे. तिने अनेक स्विमिंग स्पर्धत अव्वल क्रमांक मिळवला आहे. भारताला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवून देण्याचे तिचं स्वप्न आहे. रेवा तिच्या स्वप्नाच्या दिशेने एकेक पाऊन टाकत आहे. रेवाच्या या कामगिरीबद्दल सर्वांनीच तिचे कौतुक केले आहे.

रेवाने याआधीही अनेक विक्रम केले आहेत. २०२२ मध्येरेवाने एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडिया अवघ्या २ तास ४४ मिनिटांत पार केले आहे. रेवाच्या या कामगिरीने नवा रेकॉर्ड तयार केला आहे होता. याआधी एका १२ वर्षीय मुलीने हे अंतर २ तास ४५ मिनिटांत पार केले होते.

रेवा ही नवी मुंबईतील कोपरखैराणे येथे राहते. ती मूळची तारकर्लीची आहे. रेवा ही सेंटर फादर अग्नेल मल्टीपर्पज स्कूलमधील चौथीत शिकत आहे. रेवासाठी हा पल्ला गाठणं सोप नव्हतं. रेवाला दम्याचा त्रास आहे. तिला सतत स्वतः जवळ पंप ठेवावा लागतो. तरीही या मुलीने ही रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. त्यामुळे तिचे खूप कौतुक केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS TRANSFERS: राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती वाचा

ED Raids : माजी आयुक्त अनिलकुमार पवारांच्या घरी ईडीचा छापा; संपत्ती जाणून डोळे पांढरे होतील, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Live News Update: ठाण्याच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमंती अशिमा मित्तल यांची नियुक्ती

Tariff : ट्रम्पचा धक्का, भारताला फटका? कोण-कोणत्या उद्योगांवर होणार परिणाम, जाणून घ्या

Ladki Bahin Yojana : राज्यातील ५० लाख बहिणी अपात्र ठरल्या; काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT