Mustafizur Rahman, Chennai Super Kings SAAM TV
Sports

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जला जोरदार झटका; हुकमी एक्का पुढच्या सामन्यातून बाहेर

Mustafizur Rahman : आयपीएलच्या सुरुवातीलाच चेन्नई सुपर किंग्जला मोठा झटका बसला आहे. त्यांचा प्रमुख खेळाडू पुढील सामना खेळू शकणार नाही. कदाचित संपूर्ण आयपीएललाच मुकावे लागण्याची शक्यता आहे.

Nandkumar Joshi

Chennai super kings in IPL 2024 :

आयपीएलच्या सुरुवातीच्या तीनपैकी दोन सामन्यांत विजय मिळवून पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला चौथ्या सामन्याआधी मोठा झटका बसला आहे. संघातील प्रमुख गोलंदाज आणि हुकमी एक्का मानला जाणारा गोलंदाज मुस्तफिजूर रहमान (Mustafizur Rahman) हा पुढच्या सामन्यात खेळू शकणार नाही. इतकंच नाही तर, तो कदाचित आयपीएल स्पर्धेतूनच बाहेर होऊ शकतो, असं बोललं जात आहे.

चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना मुस्तफिजूर रहमाननं आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. पर्पल कॅपचा मानकरी असलेल्या मुस्तफिजूरला पुढचा सामना खेळता येणार नाही. याशिवाय तो संपूर्ण आयपीएल स्पर्धेलाही मुकण्याची शक्यता आहे. त्याला कोणतीही दुखापत झाली नसून, अन्य अडचणींमुळं तो मायदेशी म्हणजेच बांगलादेशला परतला आहे. तो कधी परतणार आहे, याबाबत कोणतीही माहिती नाही.

मुस्तफिजूर रहमान हा आपल्या मायदेशी परतला आहे. ५ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद विरोधात होणाऱ्या सामन्यासाठी तो उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे. वनक्रिकेटच्या रिपोर्टनुसार, तो व्हिसासंबंधी अडचणींमुळं बांगलादेशला परतला आहे. यूएसए आणि वेस्ट इंडिजला होणाऱ्या टी २० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसाठी त्याला व्हिसाची आवश्यकता आहे. त्याचसाठी तो बांगलादेशला गेल्याचे सांगितले जात आहे.

या वर्षी टी २० वर्ल्डकप स्पर्धा वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये होणार आहे. मुस्तफिजूर हा अमेरिकी व्हिसासाठी बायोमेट्रिक्स प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बांगलादेशला गेल्याचे वृत्त आहे. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही तो भारतात येऊ शकणार नाही. कारण पासपोर्ट (पारपत्र) परत करण्याआधी वेटिंग पीरियडमधून जावं लागतं. या काळात तो आपल्या मायदेशातच राहील. त्यामुळे आयपीएलमधील बरेच सामने तो खेळू शकणार नाही, असे सांगितले जात आहे.

मुस्तफिजूर रहमानची आतापर्यंतची कामगिरी

मुस्तफिजूर रहमान हा आयपीएलमध्ये चेन्नई संघाकडून खेळत आहे. यंदाच्या मोसमात तो आतापर्यंत तीन सामने खेळला आहे. त्यात त्याने १२ षटके टाकली आहेत. यात त्याने जवळपास ९ च्या सरासरीने १०६ धावा दिल्या आहेत. मात्र, यात त्याने ७ विकेट घेतल्या आहेत. चेन्नई संघाचा सध्यातरी तो टॉप परफॉर्मर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: AI द्वारे बनवला बहीण-भावाचा अश्लिल व्हिडीओ, नंतर केलं ब्लॅकमेल; तरुणाची आत्महत्या

Shocking: मी जगू शकत नाही...; बायको प्रियकरासोबत पळून गेली, वकिलाने संपवलं आयुष्य

Shreyas Iyer Health Update: श्रेयस अय्यर आयसीयूमधून बाहेर; अय्यरला नेमकी दुखापत काय झाली, कधी होईल ठणठणीत?

Nashik Crime: ठाकरे सेनेच्या सावकार नेत्याचा माज उतरवला; अपहरण प्रकरणी ठोकल्या बेड्या,नंतर काढली धिंड

Mumbai Accident : मुंबईत अपघाताचा थरार; छटपूजेहून परतणाऱ्या तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT