Mumbai Indians vs Delhi Capitals  X IPl
क्रीडा

MI vs DC: मॅकगर्क- स्टब्सनं चोपलं; MIसमोर २५८धावांचं आव्हान

Mumbai Indians vs Delhi Capitals : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलचा ४३ वा सामना होत आहे.

Bharat Jadhav

Mumbai Indians vs Delhi Capitals :

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आयपीएलचा ४३ वा सामना होत आहे. हा सामना दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर होत आहे. हे दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आलेत. दिल्लीच्या फलंदाजीने फटकेबाजी करत २० षटकात ४ विकेट गमावत २५७ धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी एमआयच्या संघासमोर २५८ धावांचे आव्हान आहे.

जॅक फ्रेझर मॅकगर्कच्या २७ चेंडूत ८४ धावांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने ४ विकेट गमावत २५७ धावा केल्या. दिल्लीच्या सलामीच्या फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. मॅकगर्कने ८४ धावांची खेळी करताना २६ चेंडूचा सामना केला. यात ११ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. तर शाई होपने १७ चेंडूत ४१ धावा केल्या यात ५ षटकाराचा सामना केला. तर २५ चेंडूत ४८ धावा केल्या. यात ६ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. या फलंदाजांच्या जोरावर दिल्लीने मुंबईसमोर २५७ धावांचे आव्हान ठेवलं होतं.

या सामन्यात मुंबईची गोलंदाज खूप महागडी ठरली. लूक वूडने ४ षटकार टाकत ६८ धावा दिल्या पण एक विकेट घेतली. तर तुषराने ४ षटकात ५६ धावा दिल्या, पण एकही विकेट घेतली नाही. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्यासुद्धा महागडा गोलंदाज ठरला. हार्दिक दोन षटक टाकलीत यात त्याने तब्बल ४१ धावा दिल्या.

या सामन्यात मुंबईची गोलंदाज खूप महागडी ठरली. लूक वूडने ४ षटकार टाकत ६८ धावा दिल्या पण एक विकेट घेतली. तर तुषराने ४ षटकात ५६ धावा दिल्या, पण एकही विकेट घेतली नाही. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या सुद्ध महागडा गोलंदाज ठरला. हार्दिक दोन षटक टाकलीत यात त्याने तब्बल ४१ धावा दिल्या.

दरम्यान या मोसमात दोन्ही दुसऱ्यांदा एकमेकांसमोर आलेत. याआधी या दोन्ही संघाचा सामना मुंबईतील वानखेडे मैदानात झाला होता. या सामन्यात मुंबईने विजय मिळवला होता. मुंबई इंडियन्स संघासाठी आतापर्यंतचा हा मोसम काही खास राहिलेला नाहीये. दिल्ली कॅपिटल्स संघाने ९ सामन्यांपैकी ४ सामन्यात विजय मिळवलाय. या विजयासह दिल्लीकडे ८ पॉईंट्स् आहेत. ६व्या स्थानावर आहे, तर मुंबई इंडियन्सने ८ सामने खेळले आहेत, ज्यात मुंबईला फक्त ३ विजय मिळालेत. पॉईट् टेबलमध्ये ६ पॉईट्स असून ते ९ व्या स्थानावर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT