suryakumar yadav devisha shetty twitter
Sports

Suryakumar Yadav: आयपीएल सुरु असतानाच सूर्या अन् पत्ती देविशाने दिली गुड न्यूज

Suryakumar Yadav And Wife Devisha Buys House: भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशाने आयपीएल सुरु असतानाच गुड न्यूज दिली आहे.

Ankush Dhavre

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या मुंबई इंडियन्सकडून आयपीएल २०२५ स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात हार्दिकच्या अनुपस्थितीत त्याला नेतृ्त्व करण्याची संधी मिळाली होती. आता ही स्पर्धा सुरु असताना, सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा यादवने मुंबईत अलिशान घर खरेदी केलं आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्ती देविशाने प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेसमेंट केली आहे. दोघांनी मिळून २१.१ कोटी रुपयांच्या २ प्रॉपर्टी खरेदी केल्या आहेत. Inspector General Of Registration च्या वेबसाईटनुसार, या कपलने देवनारमध्ये असलेल्या गोदरेज स्टाय टेरेस या टॉवरमध्ये २ अलिशान घरं खरेदी केली आहेत. ही प्रॉपर्टी २१ मार्चला खरेदी करण्यात आली आहे.

या अलिशान घराबद्दल बोलायचं झालं, तर या घराचा कार्पेट एरिया ४२२२.७ स्केअर फूट इतका आहे. या टॉवरमध्ये कार पार्किंगची सुविधा देखील आहे. एका वेळी ६ कार पार्क करता येतील इतकी मोठी पार्किंग आहे. हे घर खरेदी करण्यासाठी स्टँप ड्यूटी म्हणून १.२६ कोटी तर रेजिस्ट्रेशन फी ३०,००० रुपये इतकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व

सूर्यकुमार यादव सध्या मुंबई इंडियन्स संघाकडून खेळण्यात व्यक्त आहे. गेल्या हंगामात स्लो ओव्हर रेटमुळे लागलेल्या बॅनमुळे हार्दिक पंड्याला पहिला सामना खेळता आला नव्हता, त्यामुळे त्याच्या जागी कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आली होती. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात सूर्याला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र या खेळीचं त्याला मोठ्या खेळीत रुपांतर करता आलं नव्हतं. तो २९ धावा करत माघारी परतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT