Mumbai indians playoffs qualification scenario after mi vs lsg match amd2000 twitter
क्रीडा

MI Playoffs Scenario: मुंबईला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! फक्त करावं लागेग हे काम; वाचा समीकरण

Mumbai Indians IPL 2024 Playoffs Scenario: मुंबई इंडियन्स संघाला लखनऊ सुपरजायंट्स संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान इथून पुढे मुंबई इंडियन्स संघासाठी कसं असेल समीकरण? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ४८ वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात घरच्या मैदानावर खेळताना लखनऊ सुपरजायंट्स संघाने शानदार विजय मिळवला आहे. ७ सामने गमावलेल्या मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफच्या शर्यतीत टीकून राहण्यासाठी हा सामना अतिशय महत्वाचा होता. मात्र या महत्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान ७ सामने गमावल्यानंतर मुंबईचा संघ अजूनही प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकतो का? कसं असेल समीकरण? जाणून घ्या.

कसं असेल समीकरण?

मुंबई इंडियन्स संघाला प्लेऑफच्या शर्यतीत टीकून राहण्यासाठी कुठल्याही परीस्थितीत हा सामना जिकंणं अतिशय महत्वाचं होतं. ९ पैकी ६ सामने गमावल्यानंतर मुबंई इंडियन्स संघाला पुढील पाचही सामने जिंकायचे होते. मात्र या ५ पैकी पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

इथून पुढे मुंबईचा प्रवास आणखी खडतर झाला आहे. मुंबई इंडियन्सला जर प्लेऑफमध्ये पोहचायचं असेल, तर पुढील चारही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. यासह इतर संघांच्या विजयासाठी आणि पराभवासाठी प्रार्थनाही करावी लागेल. कारण मुंबईने इथून पुढील सर्व सामने जिंकले तरीदेखील मुंबईचा संघ १४ गुणांपर्यंत पोहचू शकतो.

आयपीएल २०२४ स्पर्धेत सुमार कामगिरी..

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच रोहित शर्माला काढून हार्दिक पंड्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र हार्दिक पंड्या फलंदाजी, गोलंदाजीसह नेतृत्वातही पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत एकूण १० सामने खेळले आहेत. यापैकी ७ सामन्यांमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर केवळ ३ सामने जिंकता आले आहेत. मुंबईचा नेट रनरेट -०.२७२ इतका आहे. मुंबईचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानी आहे.

केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊ सुपरजायंट्स संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. या संघाने आतापर्यंत खेळलेल्या १० सामन्यांपैकी ६ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : मी आपल्या दरबारात न्याय मागण्यासाठी आलोय; उद्धव ठाकरेंची जनतेला भावनिक आवाहन | Marathi News

Sanjay Raut : शेकाप ही भाजपची 'बी' टीम; संजय राऊत यांची शेकाप उमेदवार टीका

Pune News: पुण्यामध्ये मतदानाच्या दिवशी PMPMLच्या वाहतुकीमध्ये बदल, असा कराल प्रवास

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT