Mumbai Indians owner Nita Ambani Shirdi Sai Baba Darshan Saam Tv News
Sports

मॅडम... रोहित को कॅप्टन करो; साई मंदिरातून बाहेर पडताच MIच्या चाहत्याची मागणी, नीता अंबानी हात जोडत म्हणाल्या...

Nita Ambani Shirdi Sai Baba Darshan : नीता अंबानी साई मंदिरातून साई बाबांचं दर्शन घेऊन बाहेर पडताच, 'मॅडम...रोहित को कॅप्टन करो...रोहित को कॅप्टन करो मॅडम', असा आवाज आला. यावेळी सर्व गर्दीचं लक्ष त्या चाहत्याने आपल्याकडे वेधलं.

Prashant Patil

अहमदनगर (शिर्डी) : आयपीएल २०२५ मधील २९व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने आहेत. दिल्लीचा हा या मोसमातील पाचवा तर मुंबईचा सहावा सामना आहे. दिल्लीने सलग आणि एकूण ४ सामने जिंकले आहेत. तर मुंबईने ५ पैकी फक्त १ सामना जिंकलाय. तर मुंबई ४ वेळा पराभूत झालीय. अशात आता मुंबईला पराभवाची साखळी तोडायची असेल आणि जिंकायचं असेल तर पलटणच्या ५ खेळाडूंना चमकदार कामगिरी करण्याशिवाय गत्यंतर नाही. मुंबई जिंकणार की पराभूत होणार? हे या ५ खेळाडूंच्या कामगिरीवर ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीणबाई नीता अंबानी या आज शिर्डीत साई बाबांच्या समाधीच्या दर्शनाला आल्या होत्या. त्यावेळी तिथे एका मुंबई इंडियन्सच्या चाहत्याने निता अंबानींकडे मोठी मागणी केली.

नेमकं काय घडलं?

नीता अंबानी साई मंदिरातून साई बाबांचं दर्शन घेऊन बाहेर पडताच, 'मॅडम...रोहित को कॅप्टन करो...रोहित को कॅप्टन करो मॅडम', असा आवाज आला. यावेळी सर्व गर्दीचं लक्ष त्या चाहत्याने आपल्याकडे वेधलं. त्यानंतर त्याच्या या मागणीनंतर नीता अंबानी हात जोडून म्हणाल्या, 'बाबा की मर्जी...', असं नीता अंबानी त्या चाहत्याला हसत हसत म्हणाल्या.

मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीण निता अंबानी यांनी शिर्डीत साई बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. सायंकाळच्या धूप आरतीला हजेरी लावत त्यांनी साईंकडे प्रार्थना केली. आईसह नीता अंबानी या साई दरबारी आल्या होत्या. मुंबई दिल्ली सामन्यापूर्वी नीता अंबानी यांनी साई बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. याचदरम्यान, साई मंदिरातून बाहेर पडताच मुंबईच्या इंडियन्सच्या चाहत्याने रोहितला कॅप्टन करण्याची नीता अंबानींकडे मागणी केली.

दरम्यान, मुंबईचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्माला या मोसमात आतापर्यंत काही खास प्रदर्शन करता आलेलं नाही. रोहितने ४ सामन्यांमधील ४ डावात केवळ ३८ धावाच केल्या आहेत. मात्र, कमबॅकसाठी एक खेळी पुरेशी असते. त्यामुळे रोहितची बॅट जर चालली तर मुंबईचा विजय निश्चित समजायला काहीही हरकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुणेकरांनो सावधान! भेसळयुक्त खवा-मावा, तूप अन् तेलाची विक्री, २ कोटींचा साठा जप्त

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार? ऑक्टोबरचे ₹१५०० जमा होणार

Maharashtra Live News Update: गुंड निलेश घायवळने ताबा मारलेले 10 सदनिका सील करण्याचे आदेश

Diwali 2025: देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात 'या' राशी; दिवाळीमध्ये गडगंज श्रीमंत होणार व्यक्ती

Maharashtra Politics: सोलापुरात मोठी राजकीय उलथापालथ; भाजपची ताकद वाढली, बड्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांचा जम्बो पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT