Kojagiri Purnima : कोजागिरी पौर्णिमेला बनवा घरच्या घरी हलवाई स्टाइल मलाईदार रबडी, वाचा झटपट होणारी रेसिपी

Shreya Maskar

कोजागिरी पौर्णिमा

कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध तर आवर्जून बनवले जाते. पण तुम्हाला काही तरी वेगळा दुधाची रेसिपी ट्राय करायची असेल तर रबडी नक्की ट्राय करा

Kojagiri Purnima | pinterest

रबडी रेसिपी

रबडी बनवण्यासाठी दूध, साखर, वेलची, बदाम, पिस्ता, केशर, गुलाबपाणी इत्यादी साहित्य लागते. याचे प्रमाण योग्य असावे.

Rabdi recipe | pinterest

दूध उकळून घ्या

रबडी बनवण्यासाठी सर्वप्रथम जाड बुडाच्या कढईत दूध घालून मध्यम आचेवर उकळवा. दूध उकळल्यानंतर गॅस मंद करा.

Boil the milk | pinterest

दुधावरील साय

दूध मंद आचेवर शिजू द्या. दुधावर साय जमा झाल्यावर ती कढईच्या कडेने अलगद सरकवून ठेवा. अधूनमधून दूध ढवळत राहा, जेणेकरून ते कढईच्या तळाला लागणार नाही.

milk | pinterest

दूध आटवा

दूध साधारण निम्मे होईपर्यंत आटवून घ्या. यामुळे दुधाला घट्टपणा येईल आणि रबडीची चव अधिक छान होईल. ही प्रक्रिया साधारण ३० ते ४५ मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ घेऊ शकते.

Pour the milk | pinterest

साखर- वेलची घाला

आटलेल्या दुधात साखर आणि वेलची पूड घाला. केशर वापरणार असल्यास ते थोड्या कोमट दुधात भिजवून मिश्रणात मिसळा. कढईच्या कडेला जमा झालेली साय अलगद खरवडून दुधात मिसळा. त्यामुळे रबडीला दाणेदार आणि मलाईदार पोत मिळतो.

cardamom | pinterest

ड्रायफ्रूट

शेवटी गॅस बंद करा. वरून बदाम-पिस्त्याचे काप घाला. रबडी थोडी थंड झाल्यावर फ्रिजमध्ये ठेवा आणि थंडगार सर्व्ह करा.

Dry fruit | pinterest

टीप

रबडी बनवण्यासाठी पूर्ण फॅट असलेले दूध वापरा. रबडी थंड झाल्यावर आणखी घट्ट होते, त्यामुळे ती गॅसवर असताना अतिशय घट्ट करू नका.

Note | pinterest

NEXT : पहिल्यांदाच भाजणीची चकली करताय? फॉलो करा स्टेप बाय स्टेप 'ही' रेसिपी

Diwali Chakli Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...